श्रीनगर : नियंत्रण रेषा ओलांडून जम्मू-काश्मीरच्या केरन सेक्टरमध्ये शस्त्रे आणि स्फोटके पाठविण्याचा पाकिस्तानचा डाव भारतीय सैन्याने हाणून पाडला. अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले की, सैनिकांनी एके 74 रायफलसह शस्त्रास्त्रांचा साठा जप्त केला आहे.


लष्कराच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, सतर्क जवानांनी उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टरमध्ये नियंत्रण रेषा ओलांडून (एलओसी) शस्त्रे पाठविण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न परतवून लावला.


ते म्हणाले की, किशनगंगा नदीत दोघा-तिघांना दोरीने बांधलेल्या ट्यूबमध्ये काही वस्तू पाठवताना सैन्याने पाहिले. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सैनिक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी दोन बॅगांमध्ये भरलेल्या चार एके 74 रायफल, आठ मक्झिन आणि 240 काडतुसे जप्त केली. हा परिसर घेरला होता आणि शोध मोहीम सुरू आहे.


ते म्हणाले की, पाकव्याप्त काश्मीरमधून शस्त्रे आणि दारूगोळाची तस्करी करण्याचा दहशतवाद्यांचा हा एक कट होता. परंतु, सतर्क जवानांमुळे दहशतवाद्यांचा कट उधळून लावला.


पाकिस्तानच्या गुप्तहेर संघटनेचा नाशिकमध्ये हनीट्रॅप, हेरगिरीच्या आरोपाखाली एचएएल कर्मचार्‍याला अटक


श्रीनगरस्थित चिनार कोरचे कोर कमांडर लेफ्टनंट जनरल बी एस राजू म्हणाले की, "पाकिस्तानने आज सकाळी केरन सेक्टरमधील किशनगंगा नदीमार्गे ट्यूबच्या मदतीने चार एके 74 रायफल्स आणि दारूगोळाचा साठा पाठविण्याचा प्रयत्न केला. परंतु, आमच्या सतर्क जवानांनी पाळत ठेवण्याच्या उपकरणांच्या मदतीने हा साठा जप्त केला." पाकिस्तानच्या इराद्यात कोणताही बदल झालेला नाही हे यावरून दिसून येते. आम्ही भविष्यातही त्यांचे कट उधळून लावू"


कोर कमांडर म्हणाले, केरन, तंगधर, जम्मू सेक्टर आणि पंजाबमध्येही असेच प्रयत्न झाले आहेत. काश्मीरमधील लोकांना नेहमी दहशतवादाच्या छायेत ठेवणे हा त्याचा मुख्य हेतू आहे. पाकिस्तानचे असे प्रयत्न हाणून पाडणे आणि इथल्या नागरिकांना कोणतीही इजा होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. यासाठी आम्ही काश्मीरी जनतेकडून सहकार्याची अपेक्षा करतो, जेणेकरून आम्ही दहशतवाद रोखू शकू."


Bipin Rawat | 'भारतीय सैन्यानं तयारीत राहायला हवं', CDS जनरल बिपिन रावत यांचं सूचक विधान