Operation Sindoor  नवी दिल्ली : भारतीय सैन्यदलांकडून ऑपरेशन सिंदूर राबवत पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यात आला आहे. भारतानं पाकव्याप्त काश्मीरमधील मुजफ्फराबादमध्ये 9 ठिकाणांवर एअर स्ट्राईक केले आहेत. भारतीय सैन्य दलानं जस्टीस इज सर्वड असं ट्वीट केलं आहे. भारताच्या या कारवाईवर पाकिस्तानच्या पंतप्रधानांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाझ शरीफ यांनी भारतानं पाकिस्ताच्या पाच ठिकाणांवर हल्ले केले आहेत. भारताकडून करण्यात आलेल्या युद्धासारख्या कृतीचं जोरदार उत्तर देण्याचा पाकिस्तानला पूर्ण अधिकार आहे. जोरदार उत्तर दिलं जाईल.  संपूर्ण पाकिस्तानी देश सशस्त्र दलांसोबत उभा आहे. पाकिस्तान देशाचं मनोबल उच्च आणि भावना देखील जोरात आहेत. पाकिस्तानी राष्ट्र आणि पाकिस्तानी लष्कर चांगल्या प्रकारे जाणते की दुश्मनांचा सामना कशा प्रकारे करावा. दुश्मन त्यांच्या इराद्यामध्ये यशस्वी होणार नाहीत, अशी प्रतिक्रिया शहबाझ शरीफ यांनी दिली. 

Continues below advertisement


पाकिस्तानी मीडियाच्या माहितीनुसार इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सचे महाासंचालक लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी म्हटलं की भारतानं काही वेळापूर्वी बहवलपूरच्या अहमद पूर्व भागातील सुभानउल्लाह मशीद, कोटली आणि मुजफ्फराबाद या तीन ठिकाणावर हवाई हल्ले केले. आमच्या वायूसेनेची जेट विमानं हवेत आहेत. हा हल्ला भारताच्या हवाई क्षेत्रातून करण्यात आला आहे. भारताला पाकिस्तानच्या क्षेत्रात येण्याची परवानगी दिली नव्हती. मी स्पष्ट कतो  पाकिस्तान योग्य वेळी याचं उत्तर देईल, असं शरीफ चौधरी म्हणाले. 


विविध नेत्यांकडून ऑपरेशन सिंदूरचं स्वागत


भारतीय सैन्य दलानं पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये 9 दहशतवादी ठिकाणांवर हल्ले करण्यात आले आहेत. भारतीय सैन्यदलानं एक्सवर पोस्ट करत म्हटली की 'जस्टिस इज सर्वड.'
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आसामचे मुख्यमंत्री हिमांता बिस्व सरमा, राजद नेते आणि बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यासह विविध नेत्यांनी ऑपरेशन सिंदूरचं  स्वागत करत भारतीय सैन्य दलाचं अभिनंदन केलं आहे. 


दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ला 22 एप्रिलला झाला होता. जम्मू काश्मीरमध्ये आलेल्या पर्यटकांवर गोळीबार करत त्यांचा जीव घेण्यात आला होता. या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता. भारताच्या संरक्षण मंत्रालयाकडून ऑपरेशन सिंदूरवर अधिकृत माहिती देण्यात आली आहे. ऑपरेशन सिंदूर कसं राबवलं गेलं याविषयी सविस्तर माहिती नंतर देऊ,असं सांगण्यात आलं आहे.