supersonic cruise missile : भारतीय वायुसेनेने (IAF) मंगळवारी पूर्वेकडील समुद्रकिनारी सुखोई लढाऊ विमानातून ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. भारतीय नौदलाच्या समन्वयाने या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आल्याचे हवाई दलाने म्हटले आहे. यावेळी क्षेपणास्त्राने अचूकपणे लक्ष्य टिपले अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.  


हवाई दलाने या चाचनीनंतर एक ट्विट केले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, "आज वायुसेनेने पूर्व सागरी किनार्‍यावरील सुखोई 30 एमकेआय विमानातून ब्रह्मोस क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. क्षेपणास्त्राने निकामी केलेल्या भारतीय नौदलाच्या जहाजाला थेट लक्ष्य केले.  






मोठ्या 'स्टँड-ऑफ रेंज'मधून समुद्रात किंवा जमिनीवरील कोणत्याही लक्ष्यावर मारा करण्याची हवाईदलाची क्षमता वाढवण्यासाठी या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली होती. भारतीय नौदलाने 5 मार्च रोजी हिंदी महासागरातील स्टेल्थ डिस्ट्रॉयरमधून ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या उन्नत आवृत्तीची यशस्वी चाचणी घेतली. या क्षेपणास्त्राची चाचणी स्टिल्थ डिस्ट्रॉयर आयएनएस चेन्नईवरून करण्यात आली. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO), भारतीय हवाई दल आणि लष्कर यांनी संयुक्तपणे ही चाचणी घेतली. हेलिना किंवा हेलिकॉप्टरवर बेस्ड नाग मिलाइल सात किमी अंतरापर्यंतच्या लक्ष्यांवर मारा करू शकते. 


ब्रह्मोस एरोस्पेस हा एक इंडो-रशियन संयुक्त उपक्रम आहे. या उपक्रमांतर्गत सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्रे तयार करून  पाणबुडी, जहाजे, विमाने किंवा लँड प्लॅटफॉर्मवरून सोडली जाऊ शकतात.


महत्वाच्या बातम्या


जहांगीरपुरी हिंसाचार प्रकरणी आणखी एका आरोपीला बेड्या, आतापर्यंत 25 जणांना अटक


दिल्ली हिंसाचारावर केंद्रीय गृह मंत्रालयाची मोठी कारवाई, या पाच आरोपींविरुद्ध लावला 'एनएसए'