Jahangirpuri Violence : दिल्लीच्या  जहांगीरपुरी हिंसाचार प्रकरणात दररोज अटक आणि नवनवे खुलासे होत आहेत. आता  या प्रकरणी पोलिस दिल्ली पोलिस क्राईम ब्रान्चने अजून एका आरोपी गुलाम रसूल उर्फ गुल्लीला अटक केली आहे. आरोपी गुल्लीवर सोनू चिकनाला हत्यार पुरवण्याचा आरोप  आहे. सध्या पोलिस याचा तपास करत आहे.  या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत. पोलिसांनी आतापर्यंत 25 आरोपींना अटक केली आहे. 


जहांगीरपुरी परिसरात शोभायात्रेवरून शनिवारी दोन गटात हिंसाचार पाहायला मिळाला होता. घटनेनंतर पोलिसांनी दोन्ही समुदायातील जे आरोपी आहे त्यांना अटक केली आहे. या प्रकरणाकत पोलिसांनी एका कुटुंबातील पाच जणांना अटक केली आहे.


अटक झालेल्यांची नावे


जाहिद, अन्सार, शहजाद, मुख्तार अली, मो. अली, आमिर, अक्सार, नूर आलम, मोहम्मद असलम, जाकिर, अकरम, इम्तियाज, मो.अली, अहीर. शेख सौरभ, सूरज, नीरज, सुकेन, सुरेश, सुजीत सरकार, सलीम उर्फ चिकना, गुलाम रसूल उर्फ गुल्लीला अटक केली आहे. तसेच पोलिसांनी  तीन अल्पवयीन मुलांना अटक केली आहे.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय गृह मंत्रालयाने दिल्लीतील हिंसाचार प्रकरणी एनएसए लावण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच इतर आरोपींविरुद्ध देखील कडक कारवाई करण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्ली पोलिसांना कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. 


ज्या पाच आरोपींवर एनएसए लावण्यात आला आहे. त्यापैकी मुख्य आरोपी  अन्सारीचे देखील नाव आहे. तसेच सलीम, इमाम शेख उर्फ सोनू, दिलशाद, आणि आहिर विरोधात नॅशनल सिक्युरीटी अॅक्ट अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.