दुर्ग येथे प्रचारासाठी गेलेल्या उमा भारती यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रियांका गांधी यांच्या राजकारणात सक्रीय होण्याबाबत, तसेच गांधी लोकसभा निवडणूक लढणार असल्याच्या चर्चांबाबत प्रतिक्रिया विचारली होती. त्यावर भारती म्हणाल्या की, "त्यांच्या पतीवर चोरीचा आरोप आहे, त्यामुळे चोराच्या पत्नीकडे ज्या नजरेने पाहिले जाते", त्याचप्रकारे हिंदुस्तान प्रियांका गांधीकडे पाहणार आहे.
VIDEO | प्रियंका गांधी सुंदर, त्यांना चित्रपटात घेतलं असतं, शिया वक्फ बोर्डाच्या अध्यक्षाचं वादग्रस्त वक्तव्य | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा
प्रियांका गांधी वाराणसीतून निवडणूक लढणार असल्याच्या चर्चांबाबत भारती म्हणाल्या की, "भारतात लोकशाही आहे. त्यामुळे कोणताही इच्छूक उमेदवार कोणत्याही मतदार संघातून निवडणूक लढू शकतो."
भारती यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि समाजवादी पक्षाचे नेते आजम खान यांच्यावर निवडणूक आयोगाने केलेल्या कारवाईबाबत विचारले असता भारती म्हणाल्या की, "निवडणूक आयोगाने योगी आणि आजम खान या दोघांना समान दंड सुनावला आहे. परंतु दोघांच्याही अपराधांमध्ये खूप फरक आहे."
VIDEO | प्रियांका गांधी वाराणसीतून निवडणूक लढणार? रॉबर्ट वाड्रा म्हणतात.. | नवी दिल्ली | एबीपी माझा