India Weather : सध्या देशाच्या काही भागात पाऊस (Rain) सुरु आहे. तर काही भागात पावसानं दडी मारली आहे. अनेक ठिकाणी अद्याप म्हणावा तसा पाऊस झाला नाही, त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. दरम्यान, हवामान विभागानं (imd) दिलेल्या माहितीनुसार आज (3 सफ्टेंबर) पूर्व भारतात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच आज ओडिशात काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच छत्तीसगडमध्ये देखील पुढील तीन ते चार  दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच दक्षिण कर्नाटकसह महाराष्ट्राच्या काही भागात देखील पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.


देशातील 'या' भागात मुसळधार पावसाची शक्यता


हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरातील चक्राकार वाऱ्यामुळं छत्तीसगड, दक्षिण ओडिशा, तेलंगणा, विदर्भ आणि किनारी आंध्र प्रदेशच्या उत्तर भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर देशाची राजधानी दिल्लीत तापमानात वाढ झाली आहे. आजपासून दक्षिण बंगालमध्ये पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. याशिवाय मध्य प्रदेशातील काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. बिहारमध्ये काही भागात पावसाची शक्यता आहे. 


देशातील काही भागात सध्या चांगला पाऊस (Rain) झाला आहे. तर काही भागात अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार 1 जूनपासून आत्तापर्यंत देशात सरासरीच्या 91 टक्के पाऊस झाला आहे. दरवर्षी 30 ऑगस्टपर्यंत देशात 687 मिमी सर्वसाधारणपणे पाऊस होत असतो, यावर्षी मात्र प्रत्यक्षात 627 मिमी पावसाची नोंद झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे. केरळसह (Kerala) महाराष्ट्रात (Maharashtra) पावसाची मोठी तूट असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.


महाराष्ट्रात खरीपाची पिकं वाया जाण्याची भीती


महाराष्ट्रातही पावसानं चांगली ओढ दिली आहे. गेल्या 20 ते 25 दिवसापासून पावसानं दडी मारली आहे. याचा फटका शेती पिकांना बसत आहे. दरम्यान तुरळक ठिकाणीच हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. राज्यात पावसानं ओढ दिल्यामुळं शेतकऱ्यांची खरीपाची पिकं वाया जाण्याच्या मार्गावर आहेत.


केरळमध्ये पावसाची मोठी तूट


हवामान विभागानं देशात आत्तापर्यत झालेल्या पावसाची माहिती दिली आहे. देशात सरासरीच्या 9 टक्के पाऊस कमी झाला आहे. आत्तापर्यंत देशात 91 टक्के पाऊस झाला आहे. यामध्ये केरळमध्ये यावर्षी पावसाची मोठी तूट पाहायला मिळात आहे. जूनपासून केरळात आत्तापर्यंत सरासरीच्या 48 टक्के पावसाची तूट झाली आहे.  


महत्त्वाच्या बातम्या:


राज्यावर दुष्काळाचे सावट, ऑगस्टमध्ये 1901 नंतर सर्वात कमी पावसाची नोंद