Weather News : देशातील हवामानात सातत्यानं बदल (Climate change) होत आहे. कुठं थंडीचा कडाका आहे, तर कुठं ढगाळ वातावरण असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, येत्या 24 तासात उत्तर-पश्चिम भारतात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. यानंतर 3 ते 5 फेब्रुवारी दरम्यान उत्तर-पश्चिम भारतात पावसाची आणखी एक फेरी सुरु राहण्याची शक्यता आहे.


या भागात पावसाची हजेरी


दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पूर्व उत्तर प्रदेश, बिहार आणि उत्तर राजस्थान आणि उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या अनेक भागांमध्ये किमान तापमान 9 ते 12 डिग्री सेल्सियस दरम्यान आहे. याशिवाय, देशाच्या उत्तरेकडील भागात ते सामान्यपेक्षा जास्त आहे. आज फुरसातगंज (पूर्व उत्तर प्रदेश) येथे 1.0 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. तर जम्मू-काश्मीर-लडाख-गिलगिट बाल्टिस्तान-मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा-चंदीगड-दिल्ली येथे बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडला आहे. पंजाब, अरुणाचल प्रदेश, गंगेच्या पश्चिम बंगालमध्ये काही ठिकाणी, उत्तर प्रदेश, राजस्थान, आसाम आणि मेघालय, तमिळनाडू आणि केरळ आणि माहे येथे काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडला आहे.


2 ,3 आणि 5 फेब्रुवारी दरम्यान जम्मू, काश्मीर, लडाख, गिलगिट, बाल्टिस्तान आणि मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. हिमाचल प्रदेश आणि काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. पंजाब, चंदीगड, हरियाणा, दिल्लीत मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. 


या भागात गारपीट होण्याची शक्यता


हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंदीगड, पश्चिम उत्तर प्रदेशात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. 3 फेब्रुवारीला पश्चिम राजस्थानमध्ये आणि 04 फेब्रुवारीला पूर्व राजस्थानमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे. पंजाब, हरियाणा-चंदीगड-दिल्ली आणि पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये ताशी 30 ते 40 किमी वेगाने जोरदार आणि थंड वारे वाहण्याची शक्यता आहे. पुढील 5 दिवसांत (2 ते 5 फेब्रुवारी) अरुणाचल प्रदेशात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पश्चिम बंगाल आणि सिक्कीम, ओडिशा, आसाम आणि मेघालय आणि नागालँड, मिझोराम, मणिपूर आणि त्रिपुरामध्ये मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. 


अनेक भागामध्ये किमान तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने घट होणार


आज पंजाब, हरियाणा-चंदीगड, बिहारच्या काही भागांमध्ये धुके पडण्याची शक्यता आहे. तसेच उत्तर प्रदेशच्या विविध भागांमध्येही दाट धुके पडण्याची शक्यता आहे.येत्या 5 दिवसात देशाच्या बहुतांश भागात किमान तापमानात विशेष बदल होण्याची शक्यता नाही. पुढील 2 दिवसात मध्य आणि पूर्व भारतातील अनेक भागामध्ये किमान तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. त्यानंतर कोणताही महत्त्वपूर्ण बदल होणार नाही. येत्या 5 दिवसांत देशाच्या कोणत्याही भागात थंडीची लाट येण्याची शक्यता नाही.


महत्वाच्या बातम्या:


Vidarbha Weather Update : फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात विदर्भात थंडीचा जोर कसा असणार? काय आहे हवामान विभागाचा अंदाज? वाचा सविस्तर