India vs England, 4th Test LIVE Updates : पहिल्या दिवसाचा खेळ संपला; टीम इंडियाचा स्कोअर 24/1

India vs England, 4th Test, Live Cricket Score Updates : अखेरच्या दोन सामन्यात वर्चस्व गाजवणारा भारत पुन्हा एकदा गुरुवारीपासून सुरू होणाऱ्या चौथ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात जिंकण्यासाठी मैदानात उतरेल. भारतीय संघ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरण्यासाठी प्रयत्न करेल.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 04 Mar 2021 05:17 PM
पहिल्या दिवसाचा खेळ संपला असून टीम इंडियाचा स्कोअर एक विकेट गमावत 24 धावा इतका आहे. पुजाराने 15 धावा केल्या असून रोहित शर्मा 8 धावांवर खेळत आहे.
9 ओव्हर्सनंतर टीम इंडिया एक विकेट गमावत 1 विकेट गमावर 21 धावा केल्या आहेत. टीम इंडियाकडून सध्या रोहित शर्मा आणि पुजारा मैदानावर फलंदाजी करत आहेत.
टीम इंडियाने सध्या 7 ओव्हर्स पूर्ण केले आहेत. टीम इंडियाने सात ओव्हर्समध्ये सात धावा केल्या आहेत. रोहित शर्माने पाच धावांवर खेळत आहे. तर पुजारा दोन धावा केल्या आहेत.
टीम इंडियाच्या डावातील पाच ओव्हर्स संपले आहेत. टीम इंडियाचा स्कोअर एक विकेट गमावत नऊ धावा आहे. रोहित शर्माने एक चौकार लगावला तर पुजाराने आतापर्यंत आपलं खातं खोलंलं नाही.
भारताच्या पहिल्या डावाची सुरुवातही निराशाजनक झाली. अँडरसनने टीम इंडियाचा सलामीवीर शुभमन गिलला माघारी धाडलं. तो शून्यावर बाद झाला. रोहित शर्माची साथ देण्यासाठी चेतेश्वर पुजारा मैदानात आला आहे.
टीम इंडियाचा ओपनर रोहित शर्मा आणि शुभमन गिल मैदानावर उतरले असून एंडरसन इंग्लंडच्या वतीने पहिले ओव्हर टाकत आहे. एंडरसनने टीम इंडियाचा ओपनर शुभमन गिलला माघारी धाडलं.
इंग्लंडचा पहिला डाव 205 धावांवर आटोपला आहे. अँडरसन 10 धावा करुन नाबाद राहिला. इंग्लंडकडून केवळ बेन स्टोक्सने अर्धशतक केलं. अक्षर पटेलने चार विकेट्स घेतल्या, तर आर अश्विनने तीन खेळाडूंना पॅव्हेलियनमध्ये पाठवलं.
इंग्लंडला बेयरस्टोच्या रुपात चौथा धक्का बसला असून त्याने 62 चेंडूत 28 धावा केल्या आहेत. इंग्लंडची धावसंख्या सध्या चार विकेटच्या बदल्यात 79 झाली आहे.
पहिल्या तीन विकेट्स गमावल्यानंतर इंग्लडच्या बेन स्ट्रोक्स आणि जॉनी बेयरे्स्टो यांनी संयमाने फलंदाजी करत खेळाला आकार देण्याचा प्रयत्न केला. बेन स्ट्रोक्सने 24 धावा तर बेयरेस्टोने 28 धावा केल्या आहेत. त्यामुळे इंग्लंडचा डाव सावरला असून त्यांची धावसंख्या ही 74 झाली आहे.
इंग्लंडला तिसरा धक्का बसला असून कर्णधार जो रुट पाच धावांवर बाद झाला आहे. मोहम्मद सिराजने त्याला बाद केलं. इंग्लंडची धावसंख्या तीन विकेट्सच्या बदल्यात 33 धावा केल्या आहेत.
टीम इंडियाला दुसरे यश मिळालं असून अक्षर पटेलने क्रॉवलीला बाद केलं. क्रॉवली बाद झाल्यानंतर आता कर्णधार जो रुट मैदानात आला असून इंग्लडची धावसंख्या ही दोन विकेट्च्या बदल्यात आता 22 इतकी झाली आहे.
टीम इंडियाला पहिलं यश मिळालं असून सहाव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर डोम सिबली बाद झाला. अक्षर पटेलने आपल्या पहिल्याच चेंडूवर त्याला बोल्ड केले. सिबली ने दोन धावा केल्या असून इंग्लंडची धावसंख्या 10 झाली आहे.
भारतीय संघात एक बदल, जसप्रीत बुमराऐवजी मोहम्मद सिराजला संधी
अहमदाबादच्या चौथ्या कसोटीत इंग्लंडचा कर्णधार ज्यो रूटनं जिंकली नाणेफेक, इंग्लंडचा फलंदाजीचा निर्णय
इंग्लंड संघात दोन बदल, स्टुअर्ट ब्रॉड आणि जोफ्रा आर्चरला विश्रांती. डॉम बेस आणि लॉरेन्सला संधी

पार्श्वभूमी

IND Vs ENG 4th Test Match : अखेरच्या दोन सामन्यात वर्चस्व गाजवणारा भारत पुन्हा एकदा गुरुवारीपासून सुरू होणाऱ्या चौथ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात जिंकण्यासाठी मैदानात उतरेल. भारतीय संघ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरण्यासाठी प्रयत्न करेल. भारतीय संघाने मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाने अंतिम कसोटी ड्रॉ जरी केली तरी जूनमध्ये लॉर्ड्स येथे होणाऱ्या अंतिम सामन्यात ते न्यूझीलंडशी सामना करतील. इंग्लंड आणि भारत यांच्यातील अंतिम सामना सकाळी 9.30 वाजता सुरू होईल.

अंतिम शर्यतीतून इंग्लंडचा संघ बाहेर पडला आहे. परंतु जर त्यांनी अंतिम कसोटी जिंकली तर ते वर्ल्ड टेस्ट चॅम्पियमशिपच्या अंतिम सामन्यातून बाहेर टाकतील. आणि टिम पेनच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघाला अंतिम सामन्यात खेळण्याची संधी मिळेल. अशा सामन्यात ड्रॉ हा नेहमीच एक सुरक्षित पर्याय असतो. मोटेराच्या नव्या खेळपट्टीवरील तिसर्‍या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाला गुलाबी बॉलवर खेळण्यास अनेक अडचणी आल्या आणि अवघ्या दोन दिवसातच भारताने 10 गडी राखून विजय मिळवला.

डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेलच्या सरळ चेंडूंचा सामना करण्यास इंग्लंडच्या फलंदाजांना अडचण आली. भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि इंग्लंडचा फलंदाज जॅक क्रोली यांना वाटते की चौथ्या कसोटी सामना शेवटच्या दोन सामन्यांसारखाच असेल. मात्र गुलाबी बॉलपेक्षा खेळपट्टीवर लाल बॉल जास्त वेगाने येत नाही. त्यामुळे शेवटचा समाना टीम इंडियासाठीसाठी तरी महत्वाचा असणार आहे. इंग्लंड संघासाठी या सामन्यात फारसा धोका नाही. या सामन्यात इंग्लंड विजयासह मालिका ड्रॉ करण्यावर भर देईल. मात्र भारतासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीकोणातू हा सामना अत्यंत महत्वपूर्ण आहे.

अक्षर पटेल आणि आर अश्विन यांनी आतापर्यंत मालिकेत 42 विकेट घेतल्या आहेत. भारतीय फिरकी गोलंदाजांनी पहिल्या तीन कसोटी सामन्यात इंग्लंडच्या 60 पैकी 49 विकेट घेतल्या आहेत. नरेंद्र मोदी स्टेडियमवर शेवटच्या सामन्यातही त्यांची ही कामगिरी कायम रहावी ही सर्व फॅन्सना आशा आहे. रोहित शर्माने आतापर्यंत मालिकेत 296 धावा केल्या आहेत. तर अश्विनच्या नावे 176 धावा आहेत. अश्विनने चेपकच्या कठीण खेळपट्टीवर शतक ठोकले. रोहितशिवाय आतापर्यंत कोणताही भारतीय फलंदाज फिरकीपटू खेळपट्टीवर आत्मविश्वासाने खेळलेला दिसला नाही.

अंतिम सामन्यात भारतीय संघ वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहविना मैदानात उतरेल. अशा परिस्थितीत उमेश यादव पुन्हा प्लेइंग इलेव्हनमध्ये दिसण्याची शक्यता आहे. आता त्याच्यासोबत इशांत शर्मा असेल की मोहम्मद सिराज हे पाहावं लागेल.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.