India-Russia Flights : आजपासून रशिया आणि भारत (India-Russia) या दोन देशादरम्यानची विमानाची उड्डाणे पुन्हा सुरु होत आहेत. दोन महिन्यानंतर ही उड्डाणे सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रशियन एअरलाइनचे विमान दिल्लीहून मॉस्कोला जाणार आहे. एरोफ्लॉट कंपनीने 8 मार्च रोजी आपले नियोजित आंतरराष्ट्रीय उड्डाणे स्थगित केली होती.  रशियाने 24 फेब्रुवारी रोजी युक्रेनविरुद्ध युद्ध सुरु केल्यानंतर त्यांची विमानांची उड्डाणे बंद करण्याचा निर्णय घेतला होता.


आजपासून (6 मे) एरोफ्लॉटचे एअरबस 333 विमान दिल्ली ते मॉस्को उड्डाण करणार आहे. हे विमान दर सोमवारी आणि शुक्रवारी तीन श्रेणीतील एकूण 293 प्रवाशांसह उड्डाण करणार आहे. एअरलाइनने गुरुवारी एका निवेदनात याबाबत माहिती दिली आहे. या विमानात व्यवसाय, प्रीमियम इकॉनॉमी आणि इकॉनॉमी क्लास असणार आहे.


रशिया उर्वरित सैनिकांना मारण्याचा प्रयत्न करत आहे : युक्रेन


दरम्यान, रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये अद्यापही युद्ध सुरुच आहे. रशिया मारियुपोलमधील अझोव्हस्टल स्टील प्लांटमध्ये लपलेले आपले उर्वरित सैनिक काढण्याचा प्रयत्न करत आहे. रशियन लोक अझोव्स्टल प्रदेशात युक्रेनियन युनिट्सला रोखण्याचा आणि नष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहेत. विमानाच्या मदतीने, रशियाने प्लांटवर ताबा मिळवण्यासाठी पुन्हा हल्ला सुरु केला आहे. रशिया उर्वरित सैनिकांना मारण्याचा प्रयत्न करत असल्याचे युक्रेनने गुरुवारी दिलेल्या एका निवेदनात सांगितले आहे.


शेकडो युक्रेनचे सैनिक आणि काही नागरिक आठवड्यांपासून स्टील प्लांटमध्ये अडकले आहेत. त्याठिकाणी रशियाने जाहीर केलेला युद्धविराम पुन्हा सुरु केले आहे. रशियन सैन्याने प्लांटमध्ये प्रवेश करुन रक्तरंजित लढाई सुरु केल्याची माहिती मारियुपोलच्या संरक्षणाचे नेतृत्व करणाऱ्या अझोव्ह बटालियनच्या कमांडरने दिली आहे.


दरम्यान, रशिया आणि युक्रेनमधील युद्धाला 70 दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र दोन्ही देशातील संघर्ष अद्याप संपायचं नाव घेत नाही आहे. युद्धा थांबवण्यासाठी जागतिक पातळीवर अनेक प्रयत्न केले जात आहेत. अशात आता युद्ध थांबण्यावर रशियाची भूमिका समोर आली आहे. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांनी सांगितलं आहे की, रशिया विजय दिवसापर्यंत युद्धांच्या रणनितीमध्ये कोणताही बदल करण्यात येणार नाही. 9 मे हा दिवस रशिया विजय दिवस मानला जातो. कारण या दिवशीच रशियाने दुसऱ्या महायुद्धात त्यांनी जर्मनीचा पराभव केला होता. त्यामुळे 9 मेपर्यंत युक्रेन-रशिया युद्ध सुरुच राहणार आहे. मात्र, 9 मेनंतर युद्ध थांबण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


महत्त्वाच्या बातम्या: