Coronavirus India Updates : देशातील कोरोना रुग्णसंख्येत बुधवारच्या तुलनेत गुरुवारी काही अंशी घट झाल्याचं दिसून आलं आहे. गेल्या 24 तासात देशात कोरोनाच्या 16 हजार 862 नव्या रुग्णांची भर पडली आहे तर 379 लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात 19 हजार 391 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. त्या आधी बुधवारी देशात 18 हजार 987 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती तर 246 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
देशातील कोरोना लसीकरणाच्या कार्यक्रमाने चांगलीच गती घेतली असून त्याचा प्रवास आता 100 कोटीकडे सुरु आहे. देशात आतापर्यंत कोरोना लसीचे 97 कोटी 14 लाख 38 हजार 553 डोस देण्यात आले आहेत. देशातील सक्रिय रुग्णसंख्या दोन लाख तीन हजार 678 इतकी झाली आहे तर आतापर्यंत चार लाख 51 हजार 814 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
राज्यातील स्थिती
राज्यातील कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. राज्यात गुरुवारी 2 हजार 384 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे तर 35 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गुरुवारी 2 हजार 343 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 13 हजार 418 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.38 टक्के आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 8, 296 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. जळगाव (11), नंदूरबार (2), धुळे (6), जालना (49), परभणी (49), हिंगोली (19), नांदेड (15), अकोला (26), अमरावती (95), वाशिम (07), बुलढाणा (13), नागपूर (74), यवतमाळ (08), वर्धा (4), भंडारा (2), गोंदिया (3), गडचिरोली (13 ) या जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.
महत्वाच्या बातम्या :