Coronavirus India Updates : देशात गेल्या 24 तासात देशात कोरोनाच्या 15 हजार 981 नव्या रुग्णांची नोंद झाली तर 166 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्या आधी गुरुवारी कोरोनाच्या 16 हजार 862 नव्या रुग्णांची भर पडली होती तर 379 लोकांचा मृत्यू झाला होता. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता 4 लाख 51 हजार 980 इतकी झाली आहे.
सक्रिय रुग्णसंख्येत घट
कोरोनाची रुग्णसंख्या जरी कमी होत नसली तरी देशातील सक्रिय रुग्णसंख्येमध्ये सातत्याने घट होताना दिसत आहे. देशातील एकूण सक्रिय रुग्णसंख्या ही दोन लाख एक हजार 632 इतकी झाली आहे तर त्याचे प्रमाण 0.60 टक्क्यावर आलं आहे. देशात आतापर्यंत कोरोना लसीचे एकूण 97.23 कोटी इतके डोस देण्यात आले आहेत.
राज्यातील स्थिती
राज्यात कोरोना संसर्ग आता आटोक्यात येताना पहायला मिळत आहे. दैनदिन कोरोना रुग्णसंख्येतही दिवसेंदिवस घट होत आहे. असे असले तरी पुणे आणि मुंबईत मात्र अजूनही मोठ्या प्रमाणात सक्रिय रुग्णसंख्या जास्त आहे. अहमदनगर जिल्ह्यात अद्याप कोरोना रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाही. दरम्यान, राज्यात शुक्रवारी 2,149 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1 हजार 198 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 15 हजार 316 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.38 टक्के आहे. राज्यात शुक्रवारी 29 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. परिणामी राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 8 हजार 079 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर त्याखालोखाल मुंबईत 6 हजार 255 सक्रीय रुग्ण उपचार घेत आहे. राज्यात सर्वाधिक दैनदिन रुग्णसंख्येची नोंद होणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यात सध्या कोरोनाचे 3 हजार 567 सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत.
महत्वाच्या बातम्या :