नवी दिल्ली : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत असताना देशातील लसीकरणाच्या कार्यक्रमाने गती घेतली आहे. शुक्रवारी (27 ऑगस्ट) एकाच दिवसात देशात एक कोटीहून अधिक नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली असून हा एक जागतिक विक्रम आहे. भारतात जगातील सर्वात मोठा लसीकरणाचा कार्यक्रम सुरु असून आतापर्यंत कोरोनाच्या लसीचे 62 कोटीहून अधिक डोस देण्यात आले आहेत. 


देशातील लसीकरणाच्या या विक्रमाचे श्रेय हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रयत्न आणि सातत्याने श्रम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचं असल्याचं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सांगितलं.


 






केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, शुक्रवारी सर्वाधिक म्हणजे 28.62 लाख लसी या उत्तर प्रदेशात देण्यात आल्या. त्यानंतर कर्नाटकमध्ये 10.79 लाख, महाराष्ट्रात 9.84, हरियाणामध्ये 6 लाख तर पश्चिम बंगालमध्ये 5.47 लाख लसी देण्यात आल्या. 


अर्ध्या प्रौढ लोकसंख्येला लसीचा पहिला डोस
देशात आतापर्यंत 62.17 कोटी डोस देण्यात आले आहेत. यामध्ये 14. 08 कोटी लोकांना दोन्ही डोस देण्यात आले आहे तर 49.08 लाख लोकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. एकूण लोकसंख्येचा विचार करता भारताने आपल्या प्रौढ नागरिकांच्या 50 टक्के लोकसंख्येला कोरोना लसीचा पहिला डोस दिला आहे. हाही एक प्रकारचा विक्रमच म्हणावा लागेल. 


उद्योगपती बील गेट्स यांनी देशातील या लसीकरणाच्या विक्रमाचं कौतुक करुन अभिनंदन केलं आहे.  हा विक्रम म्हणजे सरकार, आरोग्य कर्मचारी आणि लसी निर्मिती करणाऱ्या कंपन्यांचे सामूहिक यश असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.


 






संबंधित बातम्या :