नवी दिल्ली : देशभरातील शिक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. देशातील सर्व शिक्षकांचे लसीकरण करण्यासाठी केंद्र सरकार या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत कोरोना लसीचे दोन कोटी अतिरिक्त डोस उपलब्ध करुन देणार आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी बुधवारी एक सर्व राज्यातील अधिकाऱ्यांसोबत एक उच्च स्तरीय बैठक घेतली. त्यानंतर ही माहिती देण्यात आली. या संबधी सर्व राज्यांतील शिक्षण विभागांशी समन्वय साधून आवश्यक माहिती घेण्यात येणार आहे. देशातील शिक्षकांच्या लसीकरणासाठी केंद्राने उचललेलं हे पाऊल अतिशय महत्वाचं मानलं जातंय. 


Covid 22 : नवीन सुपर व्हेरिएंट 'कोविड 22' हा डेल्टापेक्षाही अधिक धोकादायक; तज्ज्ञांचा इशारा


देशातील अनेक राज्यांतील शाळा सुरु करण्याचा निर्णय त्या-त्या राज्यांनी घेतला आहे. अशावेळी सर्व शाळांतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या लसीकरणावर भर द्यावा अशा सूचना केंद्राने सर्व राज्यांना दिल्या आहेत. त्यासंबंधीचे पाऊल म्हणून या आठवड्यात केंद्र सरकारने शिक्षकांच्या लसीकरणासाठी दोन कोटी अतिरिक्त डोस उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. 


देशातील ज्या लोकांनी पहिला डोस घेतला आहे त्यांना दुसरा डोस देण्यास प्राधान्य द्यावं अशा सूचना सर्व राज्यांना देण्यात आल्याचं समजतंय. गेल्या आठवड्यात केंद्र सरकारने एक आकडेवारी जारी केली होती. त्यामध्ये असं दिसून आलं होतं की ज्या लोकांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतलाय अशा 1.6 कोटी लोकांना दुसरा डोस हा वेळेत उपलब्ध झालेला नाही. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या एक कोटीहून जास्त आहे. 


Covid Vaccine : देशातील 1.6 कोटी लोकांना वेळेत दुसरा डोस नाही, ज्येष्ठ नागरिकांची संख्या अधिक


कोरोना लसीच्या दुसऱ्या डोसच्या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा स्तरावर माहिती गोळा करण्याचे आदेश केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्यांना दिले आहेत. तसेच ज्या जिल्ह्यांमध्ये लसीकरणाचा कार्यक्रम कमी प्रमाणात झालेला आहे त्या जिल्ह्यांची माहितीही मागवण्यात आली आहे. 


Coronavirus Vaccine News: देशातील पहिली mRNA बेस्ड वॅक्सिन सुरक्षित, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलसाठी DCGI ची मंजुरी