नवी दिल्ली : भारतात आता क्रिप्टोकरन्सीच्या वापराचा मार्ग मोकळा होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. पुढील वर्षी भारत स्वतःची क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) आणणार असून त्याबाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी बैठकाही झाल्याची माहिती मिळतेय. क्रिप्टोकरन्सी लॉन्च करण्यासाठी रिझर्व्ह बँकेची तयारी सुरु असल्याचीही माहिती रॉयटरने स्थानिक वृत्तसंस्थेच्या हवाल्याने दिलीय. 

Continues below advertisement

डिजिटल स्वरुपात रुपया सुरु होणारभारतात सुरु करण्यात येणारी ही डिजिटल करन्सी व्हर्चुअल असेल. मात्र देशाचे मूळ चलन हे रुपयाच असेल. म्हणजे डिजिटल स्वरुपात हा रुपया असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पुढील वर्षी डिसेंबरपर्यंत सीबीडीसीएसद्वारे सॉफ्ट लॉन्चची शक्यता वर्तवली होती. मात्र, याबाबत निश्चित कालमर्यादा दिलेली नाही.

भारताची मोठी लोकसंख्या तसेच अर्थ साक्षरता लक्षात घेता सीबीडीसीएस लॉन्च करणे सुलभ दिसत नाही. ते सुरु केल्यानंतर सर्वसामान्यांच्या जीवनातील भाग बनणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या जीवनावर त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे आरबीआयकडून त्याचा एक नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यात येत आहे. 

Continues below advertisement

या आधी सरकारने बिटकॉइनसारख्या व्हर्च्युअल करन्सीच्या वापरासंबंधी एक मंत्रीगटाची एक समिती बनवली होती. त्या गटाने आपला अहवाल सादर केला आहे. तसेच एम्पॉवर्ड टेक्नॉलॉजी गटाचीही एक बैठक झाली आहे, त्यांनीही आपला अहवाल सादर केला आहे. या आधी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी राज्यसभेत बोलताना सांगितलं होतं की, क्रिप्टोकरन्सी संदर्भातल्या एका विधेयकाला अंतिम रुप देण्यात येत आहे. त्यामुळे लवकरच हे विधेयक संसदेत सादर करण्यात येईल.

या आधी आरबीआयने बिटकॉइनसारख्या व्हर्च्युअल करन्सीच्या वापरावर 2018 साली बंदी घातली होती. ती बंदी सर्वोच्च न्यायालयाने उठवली होती.

संबंधित बातम्या :