Abir India: अबीर इंडिया (Abir India) या अहमदाबादमधील फाऊंडेशनच्या फर्स्ट टेक या कला महोत्सवाच्या पाचव्या आवृत्तीचा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. देशभरातील 122 पैकी 10 कलाकारांना त्यांच्या उत्कृष्ट कल्पनेसाठी ट्रॉफी आणि 50,000 रुपयांचे बक्षीस देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. 2500 हून अधिक सबमिशनमधून, केएस राधाकृष्णन, आरएम पलानीअप्पन, वासुदेवन अक्किथम, क्रिस्टीन माइकल आणि हर्टमुट वुस्टर यांचा समावेश असलेल्या ज्युरींच्या पॅनेलने विजेत्यांची निवड केली.
विजेत्यांची नावे-
पुण्यातील शुभंकर सुरेश चांदेरे, ठाण्यातील किन्नरी जितेंद्र तोंडलेकर, हैदराबाद येथील श्रीपमा दत्ता, आसाममधील जिंटू मोहन कलिता, कोलकाताच्या प्रिया रंजन पुरकैत, पश्चिम बंगालमधील आसिफ इम्रान गुजरात येथील रुत्विक मेहता वडोदरा येथील मौसमी मंगला आणि जितिन जया कुमार ही विजेत्यांची नावे आहेत.
पश्चिम बंगाल येथील पुरस्कार विजेते आसिफ इम्रान म्हणाले, 'माझ्या कलाकृती विविध सामाजिक-आर्थिक समस्यांशी संबंधित आहेत. जेव्हा मी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो तेव्हा मी वेगवेगळ्या वर्गातील लोकांचा अभ्यास करतो आणि माझ्या कलाकृतींद्वारे मी पाहिलेले अनुभव व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो.'
आसिफ यांनी पुढे सांगितले, 'IRST TAKE 2021 मी सादर सादर केलेली पेंटिंग महामारीच्या काळात पश्चिम बंगालची स्थिती दर्शवते. तेव्हा लोक घाबरत होतो आणि जगात काय घडत आहे हे, बाहेर जाऊन पाहण्यासाठी ते उत्सुक होते. हा पुरस्कार मिळाल्यानंतर मला खूप आनंद झाला. लॉकडाऊन दरम्यान मी काही काळासाठी सर्व आशा गमावल्या होत्या परंतु या पुरस्काराने आयुष्यात पुढे जाण्याची प्रेरणा दिली '
Smriti Irani Book : अभिनय, राजकारण आता लेखिका... स्मृती इराणींच्या पहिल्या पुस्तकाची घोषणा
रुत्विक मेहता यांनी सांगितले, 'मला लहानपणापासूनच पाळीव प्राण्यांसोबत राहायला आवडत होचो, मी त्यांचे रूप, शैली आणि गोंडस स्वभाव पाहून मोहित झालो होतो. मी अनेकदा प्राण्यांचे चित्रण करतो. मी ग्रामीण भागातून आलो आहे. त्यामुळे माझे दैनंदिन जीवन आणि माझ्या कामातून राजकारणातील वर्तमान परिस्थिती तसेच वेदना हे मांडण्याचा प्रयत्न करतो.'
International Men's Day 2021 : 'मेन विल बी मेन'; पण पुरुषांच्या मनामध्येही एक हळवा कोपरा असतो...