Delhi : सुदानमधली युद्धजन्य परिस्थिती अत्यंत भीषण आहे. युद्धग्रस्त सुदानमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांसाठी असुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी भारताचे प्रयत्न सुरु झाले आहेत. भारत नागरिकांच्या सुटकेसाठी जमिनीच्या मार्गांचा पर्याय शोधत आहे. 15 एप्रिलला सुदानची राजधानी खार्तूम आणि सुदानमधील इतर प्रदेशांमध्ये युद्धाला सुरुवात झाली. लष्करप्रमुख अब्देल फताह अल-बुरहान आणि त्यांचे विरोधक मोहम्मद हमदान डाग्लो यांच्यात चकमकी झाल्या. मोहम्मद हमदान डाग्लो हे शक्तिशाली निमलष्करी रॅपिड सपोर्ट फोर्सेसचे नेतृत्व करतात. एकेकाळी मित्रपक्ष असलेल्या या दोघांनी सत्तापालट करत 2021 मध्ये युतीचं सरकार स्थापन केलं. परंतु त्यांच्यातील संघर्ष वाढला आणि युती मोडली.


इकडे खार्तूममध्‍ये विमानतळ सुरु नसल्‍याने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यासाठी हवाई मार्गाचा वापर करणं शक्य नाही. युद्धाची परिस्थिती नागरिकांसाठी धोकादायक आहे आणि त्यामुळेच नागरिकांना सुरक्षा देणं गरजेचं आहे. त्यांच्या सुटकेसाठीच सुरक्षित जमिनीचा मार्ग शोधले जात आहेत. नागरिकांना प्राधान्याने प्रथम सुरक्षित क्षेत्रात नेण्यासाठी जमिनीवरील मार्गांचा वापर केला जाईल. सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे भारतीय दूतावासाचे कर्मचारी सध्या कार्यरत राहती जेणेकरुन रेस्क्यू ऑपरेशनमध्ये समन्वयाने मदत करता येईल.


सुदान सरकारने सांगितल्याप्रमाणे, सुदानच्या अधिकाऱ्यांव्यतिरिक्त, सुदानमधील भारतीय दूतावास संयुक्त राष्ट्र, सौदी अरेबिया, यूएई, इजिप्त आणि अमेरिका यांच्या संपर्कात आहे. सुदानमध्ये अडकलेल्या आणि त्यांना बाहेर काढू इच्छिणाऱ्या भारतीयांच्या सुरक्षित हालचालींसाठी मदतकार्य सध्या सुरु आहे. "आमच्या तयारीचा एक भाग म्हणून, आणि वेगाने मदत मिळण्यासाठी, भारत सरकार अनेक पर्यायांचा पाठपुरावा करतंय. भारतीय हवाई दलाची दोन C-130J विमानं सध्या जेद्दाहमध्ये स्टँडबायवर सज्ज आहेत. तर INS सुमेधा सुदानमधील बंदरावर पोहोचली आहे," अशी माहिती सरकारने दिली आहे. तर अमेरिकेने खार्तूममधील दूतावासाचे कामकाज तात्पुरतं स्थगित केलंय आणि संरक्षण विभागाने केलेल्या कारवाईत दूतावासातील सर्व कर्मचाऱ्यांनादेखाील बाहेर काढलं आहे.


अंडर सेक्रेटरी फॉर मॅनेजमेंट अॅम्बेसेडर बास म्हणाले, "तुम्ही अलीकडच्या काही तासांमध्ये सोशल मीडियावर पाहिलेल्या माहितीनुसार शीघ्र सुरक्षा दलाने आमच्याशी समन्वय साधला आणि या ऑपरेशनला पाठिंबा दिला. अशा आशयाच्या पोस्ट आहेत. पण तसं काही झालेलं नाही. त्यांनी ज्या प्रमाणात सहकार्य करणं अपेक्षित होतं त्याप्रमाणे त्यांनी केले नाही. ऑपरेशनदरम्यान आमच्या सेवा सदस्यांवर गोळीबार झाला. शीघ्र सुरक्षा दलाने जी काही मदत केली ती त्यांच्या स्वार्थासाठी केली असं मी म्हणेन." विविध राष्ट्रांतील 150 हून अधिक लोक एका दिवसापूर्वीच सौदी अरेबियात पोहोचले. सौदी व्यतिरिक्त, त्यात भारतासह इतर 12 देशांचे नागरिक होते. सौदी अरेबियाने बाहेर काढलेले तीन भारतीय हे सौदी अरेबियाच्या एअरलाइनचे क्रू सदस्य होते ज्यांना गेल्या आठवड्यात जमिनीवर लढाई सुरू असताना गोळ्या घातल्या होत्या.


इतर अनेक बाहेरच्या देशांनी सांगितलंय की ते त्यांच्या हजारो नागरिकांच्या संभाव्य स्थलांतराची तयारी करतायत, दक्षिण कोरिया आणि जपानजवळच्या देशांमध्ये सैन्य तैनात करत आहेत आणि युरोपियन युनियननेही अशाच हालचाली केल्या आहेत. खार्तूम हे पाच दशलक्ष लोकसंख्या असेलेलं शहर आहे, युद्धामुळे घाबरलेले लोक आपापल्या घरात आश्रयाला आहेत. तीव्र उष्णता आहेच शिवाय वीजपुरवठादेखील बंद आहे आणि बहुतेकांसाठी इंटरनेट सुविधा नाही, अशी बातमी एएफपी वृत्तसंस्थेने दिली. यूएन वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने म्हटलंय की, सुदानमधील लढाईत 420 हून अधिक लोक मारले गेले आणि 3,700 हून अधिक जखमी झालेत, पण वास्तविक मृत्यूंची संख्या जास्त असल्याचं मानलं जातंय.


महत्वाच्या बातम्या


Sudan Crisis: आठवडाभर चाललेल्या संघर्षात सुदान उद्ध्वस्त, 400 जण ठार, हजारो बेघर