नवी दिल्ली: रविवारपासून पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यासाठी आता नवीन गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. या नव्या नियमानुसार, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी यापूर्वी जे तीन सीट्सचे अंतर होते ते आता रद्द करण्यात आलं आहे. तसेच क्रू मेंमर्ससाठी व्यक्तीगत सुरक्षेसाठी पीपीई किटची आवश्यकता नसेल. 


आंतरराष्ट्रीय विमान प्रवासासाठी आज नवे नियम जारी करण्यात आले असून त्यानुसार याआधी सुरक्षा व्यवस्थेकडून करण्यात येणारी पॅटडाऊन तपासणी पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे. विमानतळावर आणि विमानातून प्रवास करताना मास्कची आवश्यकता असेल. जगभर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर 23 मार्च 2020 पासून भारतातून होणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद करण्यात आल्या होत्या. 


दरम्यान, रविवारपासून आंतरराष्ट्रीय विमानवाहतूक सुरु होणार असल्याची माहिती हवाई वाहतूक राज्यमंत्री  ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली होती. देशातील कोरोनाची रुग्णसंख्या आता नियंत्रणात येत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं होतं. 






महत्त्वाच्या बातम्या: 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह -


 


ABP Majha