MS Dhoni and Virat Kohli : आयपीएलच्या महाकुंभाला आजपासून सुरुवात होत आहे. शनिवारी गतविजेता चेन्नई आणि उपविजेता कोलकाता यांच्यात यंदाचा पहिला सामना होत आहे. धोनीने कर्णधारपद सोडल्यानंतर रवींद्र जाडेजा चेन्नईचं नेतृत्व करत आहे. तर कोलकाता संघाची धुरा श्रेयस अय्यरकडे आहे. देशभरात आयपीएलचा माहोल सुरु असतानाच धोनी आणि विराट कोहलीचा एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोची सोशल मीडियावर चर्चा आहे. 


आयपीएलचा रणसंग्राम सुरु होत असतानाच भारताचे माजी कर्णधार एम.एस. धोनी आणि विराट कोहलीची भेट झाली. संघाच्या सरावादरम्यान हे दोन दिग्गज खेळाडू भेटले आहेत. शुक्रवारी एकाच ठिकाणी आरसीबी आणि चेन्नईच्या खेळाडूंनी सराव केला. या सरावादरम्यान धोनी आणि विराट यांची भेट झाली. आरसीबीने आपल्या अधिकृत ट्विटवर धोनी आणि विराट भेटीचा फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोवर चाहत्यांचा कमेंट आणि लाईक्सचा पाऊस पडत आहे. विशेष म्हणजे, विराट कोहली आणि एम. एस. धोनी यंदा आयपीएलमध्ये खेळाडू म्हणून खेळणार आहेत. दोघांनीही आयपीएलमधील कर्णधारपद सोडले आहे.   
 
विराट कोहली आणि धोनी जवळपास एका दशकापर्यंत भारतीय संघाचा भाग होते. 2019 मध्ये धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. विराट कोहलीने 2009 मध्ये भारतीय संघात पदार्पण केले होते. तेव्हापासून या दोन्ही खेळाडूंनी भारतासाठी एकत्र क्रिकेट खेळले आहे. नुकतेच विराट कोहलीने भारताच्या तिन्ही प्रकारच्या क्रिकेटचं कर्णधारपद सोडलं. विराट कोहली अनेक वर्ष धोनीच्या नेतृत्वात खेळला आहे. धोनीनं कसोटी कर्णधारपद सोडल्यानंतर विराट कोहलीला जबाबदारी मिळाली होती. त्यानंतर 2017 मध्ये विराट कोहलीने एकदिवसीय संघाचेही नेतृत्व सांभाळण्यास सुरुवात केली होती.  






विराट कोहलीने आयपीएल 2021 च्या अखेरीस आरसीबीचं कर्णधारपद सोडलं होतं. 2013 पासून विराट कोहलीने आरसीबीचं कर्णधारपद सांभाळलं होतं. विराट कोहलीनंतर आरसीबीने दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू फाफ डु प्लेसिसकडे संघाची जबाबदारी दिली आहे.


मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live