India Monsoon News : हवामान विभागानं (IMD) दिलेल्या अंदाजानुसार यावर्षी देशात चांगला पाऊस (Rain) राहणार आहे. त्यामुळं शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, मॉन्सून (Monsoon) भारतीय उपखंडात दाखल झाला आहे. यावर्षी पावसाळा चांगला असल्याची माहिती शेती प्रश्नाचे आणि हवामानचे अभ्यासक उदय देवळाणकर (Uday Devlankar) यांनी दिली आहे. दरम्यान, देवळाणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील आठवड्यात देशात उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा इशारा त्यांनी दिलाय.  


यावर्षी एकूण पावसाळा चांगला राहणार


यावर्षी एकूण पावसाळा चांगला राहणार आहे. जूनमध्ये अधिकची उष्णता वाटणार आहे. नियमितप्रमाणे यावर्षी देखील जूनमध्ये पावसाला उशीर होईल हे नाकाराता येत नाही. त्या पार्श्वभूमीवर सर्वांनी पाण्याचे योग्य नियोजन करावं. तसेच फळबागा, बहुवार्षिक बागायत पिके जूनच्या पाहिल्या पंधरवड्यात अडचणीत येऊ शकतात असेही देवळाणकर म्हणाले.  तसेच  Imd.gov.in या website वर दिवसात 3 वेळा हवामान विवेचन केले जाते. दररोज pdf file रात्री 8 नंतर download करून अभ्यास करावा असेही देवळाणकर म्हणाले. भारतीय हवामान जे अंदाज वर्तवते त्यावरच लक्ष द्या असेही देवळाणकर म्हणाले. 


अवकाळी पावसाचा शेती पिकांना फटका


गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशात एक वेगळ्याच प्रकारचे वातावरण बघायला मिळत आहे. एकीकडे उष्णतेचा पारा तापत असताना दुसरीकडे अवकाळी पावसाने अक्षरक्ष: धुमाकूळ घातला आहे. अशातच विदर्भात अवकाळी पावसाने गेल्या अनेक दिवसापासून तळ ठोकला असताना आता हवामान विभागाकडून उष्णतेची लाटेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. विदर्भातील अकोला येथे गेल्या काही दिवसापासून उष्णतेची लाट असल्याचे बघायला मिळाले आहे. दरम्यान, अनेक ठिकाणी अवकाळी पावसामुळं शेती पिकांचं नुकसान झालं आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. 


वादळी पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी


अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोराचा पाऊस पडत आहे. यामुळं काही ठिकाणी अपघाताच्या घटना देखील घडल्या आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडे देखील आडवी झाल्याचं पाहाया मिळत आहे. या स्थितीत काही जणांना जीव देखील गमवावा लागला आहे. त्यामुळं या वादळी पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं योग्य ती खबरदारी घेतली आहे. वादळी वाऱ्यासह पावसाच्या स्थितीत नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, घराच्या बाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे. 


महत्वाच्या बातम्या:


Vidarbha Weather Update : विदर्भात उष्णतेचा कहर! अकोल्यात यंदाच्या मोसमातील उच्चांकी तापमानाची नोंद