नवी दिल्ली : चीनने तणाव कमी करण्याची स्वतःची जबाबदारी ओळखून एलएसीच्या त्यांच्याकडील बाजूला गेलं पाहिजे, असं विधान चीनमधील भारताचे राजदूत विक्रम मिसरी यांनी केलं आहे. याचा अर्थ चीनने भारतभूमीत अतिक्रमण केलं आहे, याची एकप्रकारे कबुलीचं मिसरी यांनी दिली आहे. भारत-चीन सीमावाद मिटवण्यासाठी चीनने LAC जवळील नवीन बांधकाम थांबवावे, असंही मिसरी यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले आहे. यानंतर चीन कोणती भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे आहे.


सीमावाद मिटवण्यासाठी चीननं बांधकाम थांबवावं
चीन-भारत सीमावादाच्या पार्श्वभूमीवर चीनमधील भारतीय राजदूत विक्रम मिसरी यांनी महत्वाची माहिती पीटीआयला दिली आहे. सीमावाद मिटवायचा असेल तर एलएसी जवळील बांधकाम चीनने थांबवावे, असा सल्ला राजदूत मिसरी यांनी दिलाय. सोबतचं चीनने स्वतःची जबाबदारी ओळखून एलएसीच्या त्यांच्याकडील बाजूला गेलं पाहिजे, असंही म्हटलं आहे. हे विधान अशासाठी महत्वाचं आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात घुसखोरी झाली नसल्याचं सांगितलं होतं.





चीनवर नजर ठेवण्यासाठी अमेरिका आपलं सैन्य आशियात दाखल करणार?
चीनकडून पुन्हा सीमेवर सैन्याची जमवाजमव
भारत-चीन सीमेवरील ताण अजूनही कमी होताना दिसत नाही. आजचं चीनने पुन्हा भारतीय सीमेवर केलेली सैन्याची जमवाजमव हा कराराचा भंग असल्याचा आरोप भारताने केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात भारताने हा चीनच्या सीमेवरील सैन्याच्या आणि शस्त्रास्त्रांच्या जमवाजमवीला हरकत घेतली आहे. मागच्याच आठवड्यातील हिंसक झटापटीत 20 भारतीय सैनिक शहीद झाले होते. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये लष्करी आणि राजनैतिक स्तरावर अनेक चर्चा झाल्या. यामुळे दोन्ही देशांमधील तणाव निवळत आहे, असं वाटत असतानाच चीनने पुन्हा सीमेपलीकडे सैन्याची आणि युद्धसाहित्याची आवक वाढवली आहे.


रॉयटरने दिलेल्या वृत्तानुसार त्यांनी मिळवलेल्या उपग्रहाने काढलेल्या या परिसराच्या फोटोनुसार, चीनने या परिसरात एक तळ उभारला आहे. चीनी सैन्याचा हा तळ गलवान खोऱ्यात जिथे भारत आणि चीन यांच्यात चकमक झाली त्याच ठिकाणी असल्याचं स्पष्ट दिसतं. उपग्रहातून घेतलेल्या छायाचित्रात काही तंबू दिसतात, त्याखाली काही बांधकाम सुरु असावं असा संशय रॉयटरच्या बातमीत व्यक्त करण्यात आला आहे. कारण या सॅटेलाईटद्वारे काढलेल्या या चित्रात बांधकामाच्या ठिकाणी असतात तशा भिंती आणि बॅरिकेट्स असल्याचंही दिसत असल्याचं बातमीत म्हटलं आहे.


Jammu & Kashmir | जम्मू काश्मीरच्या अनंतनागमध्ये सीआरपीएफ पथकावर हल्ला; एक जवान शहीद