UP Board Results 2020 : उत्तर प्रदेश माध्यमिक शिक्षा परिषद (UPMSP) 27 जून म्हणजे उद्या दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर करणार आहे. जवळपास 56 लाख दहावी-बारावीचे विद्यार्थी आपल्या निकालाची वाट पाहत आहेत. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना तो उत्तर प्रदेश बोर्डाच्या आधिकृत वेबसाईटवर पाहता येणार आहे.
विद्यार्थ्यांना कुठे पाहता येईल निकाल?
www.upmsp.edu.in
www.upmsp.nic.in
www.upresults.nic.in
www.upmspresults.up.nic.in
जवळापास 56 लाख विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे एकाचवेळी हे सर्व विद्यार्थी या सर्व वेबसाईटवर निकाल पाहण्य़ासाठी येतील, त्यामुळे वेबसाईट स्लो होण्याची शक्यता आहे. ही स्थिती टाळण्यासाठी विद्यार्थी अन्य पर्यायांचा वापर करुन निकाल पाहू शकतात. यासाठी विद्यार्थ्यांना आपला फोन नंबर आणि ईमेल आयडी रजिस्टर करावा लागणार आहे.
एसएमएसद्वारे मिळवा निकाल
एसएमएसद्वारे निकाल मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. दहावीचा निकाल पाहण्यासाठी UP10ROLLNUMBER असं टाईप करा आणि ते 56263 या क्रमांकावर पाठवा. बारावीचा निकाल पाहण्यासाठी UP12ROLLNUMBER असं टाईप करा आणि ते 56263 या क्रमांकावर पाठवा. या स्टेप्स फॉलो केल्यास निकाल जाहीर झाल्यानंतर काही वेळात एसएमएसद्वारे तुम्हाला तुमचा निकाल कळेल.
एबीपीवर रजिस्टर करा आपला ईमेल आयडी
विद्यार्थ्यांची संख्या अधिक असल्याने अधिकृत वेबसाईट हँग होतात किंवा ओपन होण्यासाठी खुप वेळ घेतात. हा बाब लक्षात घेत विद्यार्थ्यांची अडचण दूर करण्यासाठी एबीपीने ईमेलद्वारे निकाल पाठवण्याची सुविधा सुरु केली आहे. ईमेलद्वारे निकाल मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना खाली दिलेल्या लिंक्सवर रजिस्ट्रेशन करावं लागेल. रजिस्ट्रेशन केल्यानंतर निकाल जाहीर झाल्यावर विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल ईमेलद्वारे प्राप्त होईल.
यूपी बोर्ड दसवीं का रिजल्ट पाने के लिए यहां रजिस्टर करें
यूपी बोर्ड बारहवीं का रिजल्ट पाने के लिए यहां रजिस्टर करें