Bharat Ratna : कृषी क्षेत्रात अभूतपूर्व योगदान देणाऱ्या माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग (Chaudhary Charan Singh), माजी पंतप्रधान नरसिंह राव (Narsimha Rao) आणि डॉ. एम एस स्वामीनाथन (M S Swaminathan) यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शुक्रवारी केली. पंतप्रधान मोदींनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. सर्वप्रथम त्यांनी माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांना भारतरत्नने सन्मानित करण्यात येणार असल्याचे ट्विट केले.


हे आपल्या सरकारचे भाग्य - पंतप्रधान


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, ''देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात येत आहे, हे आपल्या सरकारचे भाग्य आहे. हा सन्मान त्यांनी देशासाठी दिलेल्या अतुलनीय योगदानाला समर्पित आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी समर्पित केले होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असोत वा देशाचे गृहमंत्री आणि आमदार म्हणूनही त्यांनी राष्ट्र उभारणीला नेहमीच गती दिली. आणीबाणीच्या विरोधातही ते ठामपणे उभे राहिले. त्यांचे आमच्या शेतकरी बंधू-भगिनींप्रती असलेले समर्पण आणि आणीबाणीच्या काळात लोकशाहीप्रती असलेली त्यांची बांधिलकी संपूर्ण देशाला प्रेरणादायी आहे.


 


 






 



पी व्ही नरसिंह राव हे विद्वान आणि राजकारणी


माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करताना, पंतप्रधान मोदींनी लिहिले, मला हे सांगताना आनंद होत आहे की माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव गरू यांना भारतरत्नने सन्मानित केले जाईल. ते विद्वान आणि राजकारणी होते.


 


 






 


 


भारताला कृषी क्षेत्रात स्वावलंबी होण्यासाठी डॉ. स्वामीनाथन यांची महत्त्वपूर्ण भूमिका - PM मोदी


पंतप्रधान मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटंलय, "भारत सरकार डॉ. एमएस स्वामीनाथन जी यांना आपल्या देशासाठी कृषी आणि शेतकरी कल्याणात दिलेल्या अतुलनीय योगदानाची दखल घेऊन त्यांना भारतरत्न प्रदान करत आहे. ही अत्यंत आनंदाची बाब आहे. आव्हानात्मक काळात भारताला कृषी क्षेत्रात स्वावलंबी होण्यासाठी मदत करण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, भारतीय शेतीच्या आधुनिकीकरणासाठी उत्कृष्ट प्रयत्न केले. एक नवोदित आणि मार्गदर्शक तसेच अनेक विद्यार्थ्यांमध्ये शिक्षण आणि संशोधनाला प्रोत्साहन देणारे त्यांचे अमूल्य कार्य आम्ही जाणतो. डॉ. स्वामीनाथन यांच्या दूरदर्शी नेतृत्वाने केवळ भारतीय शेतीचाच कायापालट केला नाही तर देशाची अन्न सुरक्षा आणि समृद्धीही सुनिश्चित केली आहे."