India Corona Cases Updates: देशात नव्या कोरोनाबाधितांचा आकडा अतिशय झपाट्यानं वाढू लागला आहे. दर दिवशी नव्यानं कोरोनाची लागण झालेल्यांचा आकडा पाहता, रुग्णसंख्यावाढीचे नकोसे विक्रमही आता तुटू लागले आहेत. केंद्रीय आरोग्य विभाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार देशात कोरोनामुळं 1 हजारहून अधिक कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं हा आकडा धडकी भरवणारा ठरत आहे. 


मागील 24 तासांत 184,372 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर, 1027 कोरोनाबाधितांचा या संसर्गामुळं मृत्यू झाला. या साऱ्यामध्ये 82,339 कोरोनाबाधितांनी मागील 24 तासांत या संसर्गावर मात केली. यापूर्वी सोमवारी 161,736 कोरोनारुग्ण आढळल्यामुळं आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनापुढं मोठं आव्हान उभं राहिलं होतं. त्यातच पडलेली नव्या रुग्णांची भर पाहता आता कोरोना देशात विदारक रुप धारण करु लागल्याचं चित्र दिसू लागलं आहे. 


आजच्या दिवसापर्यंत देशातील कोरोनाची स्थिती- 


एकूण रुग्णसंख्या- 1 कोटी 38 लाख 73 हजार 825
कोरोनावर मात केलेले एकूण रुग्ण- 1 कोटी 23 लख 36 हजार 
सध्याचे सक्रिय रुग्ण- 13 लाख 65 हजार 704
एकूण मृत्यू- 1 लाख 72 हजार 85
एकूण देण्यात आलेल्या लसी - 1 कोटी 11 लाख 79 हजार 578


kumbh mela shahi snan | कुंभमेळ्यात तिसऱ्या शाही स्नानासाठी साधूंची एकच गर्दी; कोरोनाचे नियम पायदळी 






कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता देशभरात विविध राज्यांमध्ये कमी- जास्त स्वरुपात निर्बंध लागू करत लॉकडाऊनसदृश परिस्थिती पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात याच धर्तीवप पुढली 15 दिवस संचारसबंदीचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. मंगळवारी राज्यातील जनतेला संबोधित करत असताना त्यांनी यासंदर्भातील माहिती दिली. 


राज्यातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कडक निर्बंध लागू केले आहे आहे. राज्यात आज रात्री 8 वाजेपासून 144 कलम लागू करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे आहे. आवश्यक कामाशिवाय कुणालाही बाहेर फिरता येणार नाही.  पुढील 15 दिवसांसाठी ही संचारबंदी लागू असणार आहे. मंगळवेढा- पंढरपूरमध्ये पोटनिवडणूक होत आहे. त्यामुळे मतदान झाल्यावर निर्बंध लागू होतील, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.