Coronavirus Cases in India Today 11 June: देशात कोरोनामुळं नियंत्रणाबाहेर जात असणारी परिस्थती मागील काही दिवसांपासून नियंत्रणात येत असल्याचं पाहायला मिळत आहे. देशातील विविध राज्यांमध्ये नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. 


आरोग्य मंत्रालयानं नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार सलग चौथ्या दिवशी देशात नव्या कोरोनाबाधितांची संख्या एक लाखांहून कमी असल्याचं निदर्शास आलं आहे. देशात गेल्या 24 तासांत 3403 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून, 91702 नव्या कोरोनाबाधितांचं निदान झालं आहे. तर, 1 लाख 34 हजार 580 कोरोनाबाधितांनी या संसर्गावर मात केली आहे. म्हणजेच मागच्या दिवसभरात 46281 सक्रिय रुग्ण कमी झाले आहेत. याआधी बुधवारी देशात 94052 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली होती. 


सलग 29 व्या दिवशी देशात कोरोनाबाधितांपेक्षा या संसर्गातून मुक्त होणाऱ्यांचा आकडा कमी आहे, ही देशासाठी दिलासादायक बाब. येत्या काळात कोरोना नियमांचं पालन अगदी काटेकोरपणे झाल्यास हा आकडा आणि कोरोनाचा संसर्ग निश्चितच आटोक्यात येईल असं तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. 


लसीकरणाच्या बाबतीतही देशातल सध्या चांगलं चित्र दिसत आहे. मागील 10 जूनपर्यंत देशात 24 कोटी 60 लाख लसींचे डोस देण्यात आले आहेत. गेल्या दिवसभरात देशात 32 लाख 74 हजार लसी देण्यात आल्या. लसीकरणाला वेग देण्यासोतच देशातील आरोग्य यंत्रणांकडून कोरोना चाचण्यांनाही प्राधान्य देण्यात येत आहे. 


Maharashtra Corona Cases : राज्यात गुरुवारी बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जास्त


गुरुवारी 20.44 लाख नमुने कोरोना चाचणीसाठी पाठवण्या आले. देशात आतापर्यंत 37 कोटी 42 लाख कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून, देशाचा पॉझिटीव्हीटी रेट 4 टक्क्यांहून जास्त आहे.


देशातील आजची कोरोना परिस्थिती-



  • एकूण कोरोना रुग्ण- 2 कोटी 92 लाख 74 हजार 823

  • एकूण कोरोनामुक्त- 2 कोटी 77 लाख 90 हजार 73

  • सक्रिय रुग्ण- 11 लाख 21 हजार 671

  • एकूण मृत्यू - 3 लाख 63 हजार 79


देशात कोरोना संसर्गादरम्यान, मृत्यूदर 1.23 टक्के असून, रिकवरी रेट म्हणजेच रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 94 टक्क्यांहून अधिक आहे. कोरोनाच्या सक्रिय रुग्णसंख्येच्या बाबतीत भारत जगात दुसऱ्या स्थानावर आहे. तर एकूण रुग्णसंख्येच्या यादीतही भारत दुसऱ्या स्थानावर आहे. जगभरात कोरोनामुळे अमेरिका, ब्राझील या देशांनंतर कोरोनामुळं भारतात सर्वाधिक मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. 


महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती 


राज्यात हळूहळू कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. राज्यात गुरुवारी 12 हजार 207 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात 11 हजार 449 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, आज 393 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली.