Maharashtra Corona Cases : राज्यात हळूहळू कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. राज्यात आज 12 हजार 207 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात 11 हजार 449 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, आज 393 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. 


सध्या राज्यात 1,60,693 सक्रीय रुग्ण उपचार घेत आहेत. आजपर्यंत एकूण 56,08,753 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 95.45% टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यात 10,76,165 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 6,384 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात अनलॉक उघडल्यानंतर पुन्हा कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. राज्यात आज नवीन कोरोना रुग्णसंख्येपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी आहे. राज्यात आज सर्वाधिक 1 हजार 50 नवीन कोरोना बाधित रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यात आढळले आहेत. 


आज मुंबईत कोरोनाचे 660 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 768 रुग्णांनी आज कोरोनावर मात केली. दरम्यान आज कोरोनामधून 22 जणांचा मृत्यू झाला आहे.


पुण्यात नव्याने 10 मृत्युंची नोंद
पुणे महापालिका हद्दीत नव्याने 10 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 8 हजार 447 इतकी झाली आहे. पुणे शहरात आज नव्याने 261 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता 4 लाख 73 हजार 300 इतकी झाली आहे. तर शहरातील 333 कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या 4 लाख 61 हजार 396  झाली आहे. पुणे शहरात आज एकाच दिवसात 5 हजार 753 नमुने घेण्यात आले. शहराची एकूण टेस्ट संख्या आता 25 लाख 61 हजार 336 इतकी झाली आहे. पुणे शहरात उपचार घेणाऱ्या 3 हजार 457 रुग्णांपैकी 535 रुग्ण गंभीर तर 983 रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत.