नवी दिल्ली : देशातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या आकडेवारीची गती काहीशी कमी झाली आहे. सलग दहाव्या दिवशी कोरोना रुग्णसंख्येची आकडेवारी एक लाखांहून कमी आली आहे. गेल्या 24 तासांत देशात 67,208 नव्या रुग्णांची भर पडली आहे तर 2330 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात एक लाख तीन हजार 570 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्या आधी मंगळवारी देशात  62 हजार 224 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती तर दोन हजार 542 रुग्णांचा मृत्यू झाला होता.


देशातील आजची कोरोना स्थिती



  • एकूण कोरोना रुग्ण : दोन कोटी 97 लाख 313 

  • एकूण कोरोनामुक्त रुग्ण : दोन कोटी 84 लाख 91 हजार 670 

  • एकूण सक्रिय रुग्ण : 8 लाख 26 हजार 740

  • एकूण मृत्यू : 3 लाख 81 हजार 903

  • आतापर्यंतची एकूण लसीकरणाची आकडेवारी : 26 कोटी 55 लाख 


देशातील कोरोना रुग्णांचा मृत्यू दर हा 1.28 टक्के इतका आहे तर रिकव्हरी दर हा 96 टक्के इतका आहे. 


राज्यातील कोरोनाची स्थिती
राज्यात बुधवारी 10 हजार 107 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 10 हजार 567  कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. बुधवारी 237 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात सध्या एकूण 1,36,661 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. सरकारी आकडेवारीनुसार राज्यातील 21 जिल्हे आणि मनपा क्षेत्रात एकाही मृत्यूची नोंद करण्यात आलेली नाही तर 12 ठिकाणी केवळ एका मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.94 टक्के एवढा आहे. 


आजपर्यंत एकूण 56,79,746 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण  95.7 टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,86,41,639 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 59,34,880 (15.36 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.  सध्या राज्यात 8,78,781 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 5,401 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.


आज नोंद झालेल्या एकूण 237 मृत्यूपैकी 144 मृत्यू हे मागील 48 तासातील तर 93 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे.


महत्वाच्या बातम्या :