India China Conflict :  लडाखमध्ये (Ladakh) चीनसोबत (China) झालेल्या संघर्षानंतर भारतीय सैन्याने (Indian Army) प्रत्यक्ष ताबा रेषेवरील (LAC) गस्त वाढवली आहे. भारतीय जवानांनी गस्त घालण्यासाठी घोडे आणि खेचरांचा वापर सुरू केला आहे. सोशल मीडियावर याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओनुसार, भारतीय जवान एलएसीजवळील भागात घोड्यांवरून गस्त घालत आहेत. 


याआधी, काही दिवसांपूर्वी, क्रिकेट खेळत असलेल्या भारतीय जवानांचा फोटो व्हायरल झाला होता. भारतीय जवानांनी क्रिकेट कोणत्या ठिकाणी खेळले, याची माहिती देण्यात आली नाही. जून 2020 मध्ये भारत-चीनच्या जवानांमध्ये संघर्ष उफाळून आला. त्यानंतर दोन्ही देशांचे सैन्य (India China Army) अलर्टवर आहे. 






चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांचे मोठे वक्तव्य


दुसरीकडे, चीनचे परराष्ट्र मंत्री किन गँग सध्या दिल्लीत आहेत. ते G-20 देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी आले आहेत. किन गँग म्हणाले, शेजारी देश आणि प्रमुख उदयोन्मुख अर्थव्यवस्थांच्या दृष्टिकोनातून चीन आणि भारताचे मतभेदांपेक्षाही अधिक समान हितसंबंध आहेत. दोन्ही बाजूंनी आपल्या द्विपक्षीय संबंधांकडे जगामध्ये शतकात एकदाच होत असलेल्या बदलांच्या दृष्टिकोनातून पाहावे आणि आधुनिकीकरणाच्या मार्गावर दोन्ही देशांनी पुढे जायला हवे, असे त्यांनी म्हटले.


परिस्थितीवर लक्ष ठेवून; लष्कराचे प्रतिपादन


जम्मू-काश्मीर आणि लडाख या दोन्ही सीमेवर सतत उद्भवणारे धोके आणि आव्हानांचा सामना करण्यासाठी भारतीय लष्कर पूर्णपणे सज्ज आहे. असे भारतीय लष्कराचे कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी सांगितले. ते म्हणाले, "भारतीय लष्कर देशाच्या लोकशाही परंपरा जपत भारताचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहे, असल्याचे त्यांनी म्हटले. आम्ही सतत देखरेख करत आहोत. सर्व घडामोडींवर लक्ष ठेवत असून राष्ट्राच्या हिताचे रक्षण करण्यासाठी सर्व शक्य उपाययोजना करत आहोत आणि आवश्यकता भासल्यास योग्य पावले उचलू असे त्यांनी म्हटले. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: