लडाख : भारत आणि चीन या दोन्ही राष्ट्रांमध्ये तणावाची परिस्थिती उद्भवलेली आहे. दरम्यान लडाखच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून (LAC) भारतीय लष्कराने चीनच्या एका सैनिकाला पकडले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार  पँगॉंग सरोवरच्या दक्षिण भागातून चीनचा सैनिकाला पकडण्यात आले. पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (पीएलए) हा सैनिक आहे.  एलएसी अर्थात लाईन ऑफ अॅक्च्युअल कंट्रोल ओलांडून भारतीय हद्दीत आला होता. चीनच्या लष्कराला या संदर्भात भारतीय लष्कराने माहिती दिली आहे.


वर्षभरातील दुसरी घटना


वर्षभरातील ही दुसरी घटना आहे. या अगोदरही एकदा पीएलए चे सैनिक भारतीय लष्कराने पकडले होते. पकडलेल्या सैनिकांना कोणत्या परिस्थितीत बॉर्डर ओलांडली याचा तपास केल्यानंतर काही दिवसातच प्रक्रियेनुसार, त्याला परत चीनकडे सोपवण्यात आले.


मे 2020 पासून सुरु आहे संघर्ष....
चीन आणि भारत या दोन्ही राष्ट्रांमध्ये मागील वर्षापासून म्हणजेच 2020 मधील मे महिन्यापासून संघर्ष सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. 14 मे रोजी रात्रीच्या सुमारास इथं दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये हिंसक झडप झाली होती. ज्यामध्ये 20 भारतीय जवान शहीद झाल्याचं म्हटलं गेलं. ज्यानंतर दोन्ही देशांमध्ये असणाऱ्या संबंधांमध्ये कमालीचा तणाव पाहायला मिळाला. याच धर्तीवर देशाचं सार्वभौमत्त्व अबाधित राखण्यासाठी आणि संरक्षणाच्या कारणासाठी अनेक चीनी बनावटीच्या अॅप्सवर भारतात बंदीही घालण्यात आली. शिवाय अनेक चीनी कंपन्यांशी असणारे करारही रद्द करण्यात आले.


संबंधित बातम्या :