नवी दिल्ली : देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त म्हणजेच 15 ऑगस्टच्या तयारी पूर्वी देशातील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. कोरोना महामारीच्या दरम्यान, यंदाचा स्वातंत्र्य दिन खूप धुमधडाक्यात साजरा होणार नाही. असं असलं तरीही नागरिकांमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी खूप उत्साह आहे. आपला देश यावर्षी 75वा स्वातंत्र्य दिवस साजरा करतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या राष्ट्राला संबोधित करणार आहेत. कोरोना व्हायरस संकटात पंतप्रधान मोदींनी याआधीही अनेकदा देशाला संबोधित केलं आहे.
15 ऑगस्टला पंतप्रधान लालकिल्ल्यावरुन देशाला संबोधित करतात. 1947 साली देश स्वतंत्र झाला तेव्हा तत्कालिन पंतप्रधान पंडित नेहरु यांचं भाषण 72 मिनिटे चाललं. त्यानंतर सर्वात लांबलेलं भाषण होतं ते नरेंद्र मोदी यांचं 2016 साली. नरेंद्र मोदी सर्वाधिक 94 मिनिटे बोलले होते. 2014 पासून मोदी लाल किल्ल्यावरील भाषणात तीन वेळा 90 मिनिटे किंवा त्यापेक्षा जास्त वेळ बोलले आहेत. 2017 साली ते सर्वात कमी म्हणजे 56 मिनिटे बोलले होते.
गेल्या काही वर्षात कोणत्या पंतप्रधानांच भाषण किती वेळ चाललं?
वर्ष पंतप्रधान भाषणाचा कालावधी
2002 अटलबिहारी वाजपेयी 25 मिनिटे
2003 अटलबिहारी वाजपेयी 30 मिनिटे
2004 मनमोहन सिंह 45 मिनिटे
2005 मनमोहन सिंह 50 मिनिटे
2006 मनमोहन सिंह 50 मिनिटे
2007 मनमोहन सिंह 40 मिनिटे
2008 मनमोहन सिंह 45 मिनिटे
2009 मनमोहन सिंह 45 मिनिटे
2010 मनमोहन सिंह 35 मिनिटे
2011 मनमोहन सिंह 40 मिनिटे
2012 मनमोहन सिंह 32 मिनिटे
2013 मनमोहन सिंह 35 मिनिटे
2014 नरेंद्र मोदी 65 मिनिटे
2015 नरेंद्र मोदी 88 मिनिटे
2016 नरेंद्र मोदी 94 मिनिटे
2017 नरेंद्र मोदी 56 मिनिटे
2018 नरेंद्र मोदी 83 मिनिटे
2019 नरेंद्र मोदी 92 मिनिटे
2020 नरेंद्र मोदी 90 मिनिटे
संबंधित बातम्या :
- Independence Day : भारताच्या स्वातंत्र्यासाठी 15 ऑगस्ट हाच दिवस का निवडला? काय आहे त्यामागचे ऐतिहासिक कारण?
- Independence Day : लाल किल्ल्याच्या सुरक्षेसाठी 'कंटेनरची भिंत'; 'राष्ट्र प्रथम-सदैव प्रथम' चा संदेशही देणार
- Independence Day : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर राजधानी मुंबईत सुरक्षाव्यवस्था तगडी, मुंबई पोलिसांचं मिशन ऑलआऊट