पणजी : भारतातील (India) सर्वात महत्त्वाचं आणि मुख्य पर्यटन स्थळ असलेल्या गोव्यामध्ये (Goa) टोमॅटो, तेल या रोजच्या वापरातील गोष्टी खरेदी करणे आता बियर (beer) खरेदी करण्यापेक्षा अधिक अवघड झाले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार गोव्यातील लोकप्रिय 'गोवा किंग्स पिल्सनर' बीयर 60 रुपयेला मिळत असून त्यापेक्षा टॉमेटो प्रतिकिलो अधिक महाग पडत आहेत. 


सध्या गोव्यामध्ये टॉमेटोची (Tomatos Price) किंमत 100 रुपयांच्या घरात पोहोचली आहे. पेट्रोल (Petrol Price) तेलही महागच आहे. पण दुसरीकडे बियर मात्र 60 रुपयांना मिळत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. यंदा झालेल्या अवकाळीमुळे गोव्यात टोमॅटोचे भाव एकीकडे वाढले आहेत. पण दुसरीकडे गोव्यातील दारूचे दर (Alcohol Rates in Goa) मात्र स्थिर आहेत. दरम्यान बऱ्याच जागी टोमॅटो 70 रुपये प्रतिकिलो मिळत आहे. असे असले तरी बियर 60 रुपयांना असल्याने टॉमेटो अधिक महाग असल्याचेच समोर येत आहे.


दुकानदार हवालदिल


एका नाराज दुकानदाराने टाईम्स ऑफ या वृत्तपत्राला दिलेल्या माहितीत सांगितले की, "हे खूप निराशाजनक आहे. चिली फ्राय आणि आमलेटसारख्या पदार्थांतून टॉमेटो गायब झाला आहे. टॉमेटो विकत घेणारेही अगदी कमी किंमतीत टॉमेटो विकत घेत आहेत.'' बियर टॉमेटोपेक्षा स्वस्त झाल्याची खंतही त्याने व्यक्त केली आहे.


 


हे ही वाचा




मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live