Aadhar Card Update : देशातील सर्वात महत्वाच्या ओळखपत्रांपैकी एक आधार कार्ड (Aadhar Card) यामध्ये काळानुसार अनेक बदल होत आहेत. आता आधार कार्डामध्ये जर तुम्ही बदल करणार असाल तर वडिलांशी किंवा पतीशी असलेल्या नात्याची ओळख कार्डमध्ये उघड होणार नाही. आधार कार्डावरुन आता नात्यांची ओळख पटणार नाही. आता याचा वापर केवळ ओळख पटवण्यासाठीच होईल. आधार कार्डावर आता वडील किंवा पतीच्या नावासमोर 'केयर ऑफ' लिहून येईल.
नात्या ऐवजी 'केअर ऑफ' लिहिलं जाणार
काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीनं आपल्या घराचा पत्ता बदलल्यामुळं आपल्या कुटुंबियांचे आधार कार्ड अपडेट केले. ज्यामध्ये वडिलांसोबतच्या नात्याऐवजी 'केअर ऑफ' असं लिहून आलं. त्यांना वाटलं की, हे चुकून झालं आहे. परंतु, त्यानंतर जेव्हा त्यांनी आधार सेंटरवर जाऊन त्याबाबत सांगितंलं त्यावेळी समजलं की, ही चूक नसून बदललेल्या नियमामुळं असं दिसत आहे.
'केअर ऑफ' म्हणून वडिल, पतीऐवजी कोणाचंही नाव देणं शक्य
आधार कार्ड अपडेटसाठी अधिकृत CSC चे व्यवस्थापक संचालक दिनेश त्यागी यांनी सांगितले की, आता आधार कार्डासाठी वडील, मुलगा, मुलगी यांच्याऐवजी 'केअर ऑफ' असं लिहून येणार आहे. अर्जदार यामध्ये कोणाचंही नाव देऊ शकत नाही. आधार कार्डावर कोणातंही नातं दर्शविलं जाणार नाही. तसेच अर्जदार आधार कार्ड फक्त नाव आणि पत्ता देऊन अपडेट करू शकतात. आधार कार्ड कोणतेच संबंध निश्चित करणार नाही, असंही त्यांनी सांगितलं आहे.
... म्हणून केला गेला बदल
UIDAI च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, 2018 मध्ये आधार कार्डाबाबत सुप्रीम कोर्टानं एक महत्त्वाचा निर्णय दिला होता. ज्यात लोकांच्या खाजगी आयुष्याबाबत म्हटलं गेलं होतं. त्याच निर्णयाच्या आधारे कार्डावर अर्जदाराचे नातेसंबंध स्पष्ट केले जाणार नाही. हे बदल कधीपासून लागू करण्यात आले, याबाबत UIDAI नं कोणतीही माहित दिलेली नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Aadhaar : आधार कार्ड हरवलंय? काळजी करु नका, असं मिळवा तुमचे आधार कार्ड