Modi to review vaccination : जी 20 शिखर परिषद आणि हवामान बदल परिषद 26(COP26) मध्ये सहभागी होऊन देशात परतल्यानंतर लगेचच, पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून कमी लसीकरण झालेल्या जिल्ह्यांसोबत आढावा बैठक घेणार आहेत. कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस 50% पेक्षा कमी दिलेल्या आणि दुसऱ्या डोसची व्याप्ती अत्यंत कमी असलेल्या जिल्ह्यांचा या बैठकीत समावेश असेल. झारखंड, मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश, महाराष्ट्र, मेघालय आणि अन्य राज्यातील कमी लसीकरण व्याप्ती असलेल्या 48 जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी संवाद साधणार आहेत. यावेळी या राज्यांचे मुख्यमंत्रीही उपस्थित राहणार आहेत.
आरोग्य मंत्र्यालायाच्या माहितीनुसार, 27 राज्यातील 48 जिल्ह्यांमध्ये लसीकरण संथ गतीनं सुरु आहे. उत्तरेकडील मणिपूर आणि नागालँड या राज्यातील प्रत्येकी 8-8 जिल्ह्यांचा समावेश आहे. झारखंडमधील सर्वाधिक जिल्ह्यांचा समावेश आहे. झारखंडमधील 9 जिल्ह्यात 50 टक्केंपेक्षा कमी लोकांनी पहिला डोस घेतलेला नाही. महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आढावा बैठकीपूर्वी या राज्यात विशेष लसीकरण मोहीम राबवली जाण्याची शक्यता आहे. प्रत्येकाला घरी जाऊन लसीकरण केलं जणार आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीत मनसुख मंडाविया यांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या दुसऱ्या डोसचा मुद्दा उपस्थित केला होता. 10.34 कोटी लोकांनी निर्धारित वेळेत दुसरा डोस घेतला नसल्याचं मंडाविया यांनी आपल्या बैठकीत सांगितलं. तसेच नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत सर्व पात्र असणाऱ्यांना पहिला डोस देण्यात यावा, अशी सूचना दिली होती.
जिल्ह्यांचा रिपोर्टकार्ड -
झारखंड -
पाकुर (37.1%), साहेबगंज (39.2%), गढ़वा (42.7%), देवघर (44.2%), पश्चिम सिंहभूम (47.8%), गिरिडीह (48.1%), लातेहार (48.3%), गोड्डा (48.3%) आणि गुमला (49.9%)
मणिपूर -
कांगपोक्पी (17.1%), उखरूल (19.6%), कामजोंग (28.2%), सेनापती (28.6%), फेरजॉल (31.1%), तमेंगलॉन्ग (35%), नोनी (35.4%) आणि तैंग्नोपाल (43.7%)
नागालँड -
किफीर (16.1%), तुएसांग (20.8%), फेक (21.9%), पेरेन (21.9%), मोन (33.5%), वोखा (38.5%), जुन्हेबोटो (39.4%) आणि लाँगलैंग (40.4%)
अरुणाचल प्रदेश -
क्रदादी (18.3%), कुरुंग कुमे (27.4%), अपर सुबांसिरी (32.1%), कामले (36.4%), लोअर सुबांसिरी (41.3%) आणि कमेंग (42.5%)
महाराष्ट्र -
औरंगाबाद (46.5%), नंदुरबार (46.9%), बुलढाना (47.6%), हिंगोली (47.8%), नांदेड (48.4%) आणि अकोला (49.3%)
मेघालय -
पश्चिम खासी हिल्स (39.1%), दक्षिण गारो हिल्स (41.2%), पूर्व गारो हिल्स (42.1%), पश्चिम जांतिया हिल्स (47.8%)
याशिवाय, नूह (हरियाणा 23.5%), थिरुवल्लूर (तामिळनाडू 43.1%), दक्षिण सालमारा मनकाचार (आसाम 44.8%), नारायणपूर (छत्तीसगड 47.5%), उत्तर-पश्चिम दिल्ली (48.2%), लॉन्गतलाई (मिजोरम 48.6%), अररिया (बिहार 49.6%) या जिल्ह्यांचा समावेस आहे.