Udaan Yatri Cafe : तुम्ही कधी विमानतळावर गेला असेल तर तुम्हा तेथील पाणी, चहा, कॉफीची किंमत एकूण धक्का बसला असेल. कारण तिथे प्रत्येक वस्तूची किंमत बाहेरच्या तुलनेत सुमारे 10 पट जास्त असते. त्यामुळं प्रवाशांना मोठा आर्थिक फटका बसतो. मात्र, आता प्रवाशांना चहा, कॉफीसाठी आणि पाण्यासाठी जास्त किंमत मोजावी लागणार नाही. कारण सरकारनं एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता सर्व विमानतळांवर उडान यात्री कॅफे सुरु करण्यात येणार आहे. यामध्ये तुम्हाला अगदी माफक दरात वस्तू मिळणार आहेत. 


विमानतळावर तुमच्या फ्लाइटची वाट पाहत तुम्ही तास न तास तिथं बसता. मात्र तिथे जर तुम्हाला पाणी, चहा कॉफी घ्यायची असेल तर त्यासाठी मोठी किंमत मोजावी लागते. विमानतळावर वस्तू खूप महाग भेटतात. मात्र, सरकारनं घेतलेल्या निर्णयामुळं विमानतळावर देखील स्वस्त दरात वस्तू उपलब्ध होणार आहेत. विमानतळावर प्रत्येक वस्तूची किंमत बाहेरच्या तुलनेत सुमारे 10 पट जास्त असते. मात्र, या परिस्थितीवर मात करण्यासाठी भारत सरकारने एक नवीन योजना आणली आहे. आता सरकारच्या वतीनं प्रत्येक विमानतळावर उडान यात्री कॅफे सुरु करण्यात येणार आहे. यामध्ये स्वस्त दरात पाणी, चहा, कॉफी मिळणार आहे. 


कोलकाता येथील नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन होणार सुरुवात


भारतीय विमानतळ प्राधिकरण, केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालयाच्या वतीने, त्यांच्या नियंत्रणाखालील सर्व विमानतळांवर उडान यात्री कॅफे सुरू करणार आहे. इथे अगदी माफक किमतीत  तुम्हाला सर्व वस्तू मिलणार आहेत. कोलकाता येथील नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन याची सुरुवात होईल. हा एक पायलट प्रोजेक्ट आहे. लवकरच विमानतळ प्राधिकरणाच्या इतर विमानतळांवरही असे कॅफे सुरू केले जातील.


भारतात विमान वाहतूक क्षेत्रात झपाट्यानं वाढ


कोलकाता विमानतळाला 100 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त शताब्दी सोहळ्यात लोगोचे लोकार्पण केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.हवाई प्रवाशांचा प्रवास अनुभव सुधारण्यासाठी विमानतळावरील उडान यात्री कॅफेमध्ये अल्प दरात अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात येत आहे. भारतात विमान वाहतूक क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. यामुळं एकीकडे आर्थिक विकास होत आहे तर दुसरीकडे रोजगार निर्मितीलाही मदत होत असल्याची माहिती त्यांनी दिली. 


दरम्यान सरकारनं घेतलेल्या या निर्णयाचा विमान प्रवाशांना फायदा होणार आहे. त्यांच्या खिशाला बसणारी अधिकची झल आता वाचणार आहे.