PhonePe Processing Fee: जर तुम्ही PhonePe वापरत असाल तर ही माहिती तुमचे टेन्शन वाढवू शकते. वास्तविक PhonePe ने आता मोबाईल बिलांसाठी चार्जिंग फी (charging fee) आकारण्यास सुरुवात केली आहे. फोन पे चे म्हणणे आहे की त्यांनी हे प्रयोग म्हणून सुरू केले आहे.
आपल्या सर्व प्रतिस्पर्ध्यांनी मोबाईल बिलांवर शूल्क आकारण्यास सुरुवात केल्यानंतर, वॉलमार्टच्या मालकीच्या PhonePe नेही हा ट्रेंड फॉलो केला आहे. सध्या प्रक्रिया शुल्क फक्त मोबाईल रिचार्जवर लागू आहे आणि तेही 50 रुपयांपेक्षा जास्त व्यवहारांसाठी. हे अद्याप सर्व वापरकर्त्यांसाठी सुरू केले गेले नाही.
किती शुल्क लागणार?
50 रुपयांपेक्षा कमी मूल्य असलेल्या कोणत्याही मोबाइल रिचार्जवर प्रक्रिया शुल्क माफ केले जाईल, तर 50 ते 100 रुपयांच्या रिचार्जवर 1 रुपये प्रक्रिया शुल्क आकारले जाईल. 100 रुपयांवरील सर्व मोबाइल रिचार्जसाठी 2 रुपये प्रक्रिया शुल्क आकारले जाईल.
PhonePe म्हणते, “आम्ही हे अगदी लहान प्रमाणात वापरत आहोत जिथे काही वापरकर्ते मोबाइल रिचार्जसाठी पैसे देत आहेत. 50 रुपयांपेक्षा कमी रिचार्जवर शुल्क आकारले जात नाही, 50 ते 100 रुपयांच्या दरम्यान 1 रुपये आणि 100 रुपयांपेक्षा जास्तीच्या रिचार्जवर 2 रुपये शुल्क आकारले जाईल. प्रयोगाचा एक भाग म्हणून, बहुतेक वापरकर्ते एकतर काहीही देत नाहीत किंवा केवळ 1 रुपये देत आहेत."
त्यामुळे तुम्हाला शुल्क द्यावे लागेल की नाही हे तुमचे खाते एक्सपेरिमेंटल गटाशी संबंधित आहे की नाही यावर अवलंबून आहे. सुरुवातीच्या टप्प्यावर बहुतेक वापरकर्ते प्रक्रिया शुल्क भरणार नाहीत. मात्र, प्रयोग यशस्वी झाल्यास, PhonePe 50 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या सर्व मोबाइल रिचार्जसाठी प्रक्रिया शुल्क आकारू शकते. कंपनी भविष्यात इतर व्यवहारांसाठी प्रक्रिया शुल्क आकारणे देखील सुरू करू शकते.
PhonePe क्रेडिट कार्डद्वारे केलेल्या सर्व व्यवहारांसाठी शुल्क आकारते. मात्र, PhonePe वरील इतर पेमेंट सेवांसाठी कोणतेही प्रक्रिया शुल्क नाही. यात मनी ट्रान्सफर आणि वॉलेट पेमेंटचा समावेश आहे.
PhonePe भूमिका काय?
या संपूर्ण प्रकरणावर फोनपे म्हणाले, "आम्ही शूल्क आकारणारे एकटेच नाही. बिल पेमेंटवर थोडे शुल्क आकारणे आता एक मानक उद्योग पद्धत बनली आहे आणि इतर बिलर वेबसाइट आणि पेमेंट प्लॅटफॉर्मद्वारे देखील शूल्क आकारतात. आम्ही फक्त क्रेडिट कार्ड पेमेंटवर प्रक्रिया शुल्क (इतर प्लॅटफॉर्मवर सुविधा शुल्क म्हणून ओळखले जाते) आकारतो."