Seafood : कतारने (Qatar) भारतातून होणाऱ्या सीफूडच्या (Seafood) आयातीवरील बंदी (Ban on Imports) उठवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता भारतातून (India) कतारतला सीफूड निर्यातीचा (seafood exports) मार्ग मोकळा झाला आहे. आता निर्यातीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे पश्चिम आशियाई देशांबरोबर भारताचे द्विपक्षीय संबंध सुधारण्यास मदत होणार आहे. 


दोन्ही देशातील संबंध सुधारण्यास मदत होणार


सीफूडच्या आयातीच्या संदर्भात कतारने मोठा निर्णय घेतला आहे. भारतातून गोठवलेल्या सीफूडच्या आयातीवर घातलेली तात्पुरती बंदी कतारने उठवली आहे. यामुळे दोन्ही देशातील संबंध सुधारण्यास मदत होणार आहे. मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये, फिफा विश्वचषकापूर्वी भारतातून पाठवण्यात आलेल्या काही मालात व्हिब्रिओ कॉलरा विषाणू आढळून आला होता. त्यानंतर सीफूडच्या आयातीवर कतारने बंदी घातली होती. फुटबॉल स्पर्धेच्या धावपळीत त्यांच्या देशात पुरेशा चाचणी प्रयोगशाळांच्या अभावामुळे ही तात्पुरती बंदी घातली असल्याचे कतारच्या अधिकाऱ्यांनी भारताला कळवलं होतं. दरम्यान, आता पुन्हा भारतातून कतारमध्ये सीफूडच्या निर्यातीचा मार्ग मोकळा झाला आहे.


Exports : निर्यातीचा मार्ग मोकळा करण्यासाठी वाणिज्य मंत्रालयानं केले प्रयत्न 


सीफूडच्या निर्यातीचा मार्ग मोकळा करण्यासाठी कतारमधील भारतीय दूतावासासह भारत सरकारचा वाणिज्य मंत्रालयाच्या विभागाच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न केले जात होते. कतारच्या सार्वजनिक आरोग्य मंत्रालयाबरोबर चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या होत्या. त्यानंतर 16 फेब्रुवारी रोजी भारतातून गोठवलेल्या सीफूड आयातीवरील बंदी उठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता सीफूडची निर्यात करता येणार आहे.


Seafood Exports : चालू वर्षात पश्चिम आशियाई देशात सुमारे 90 कोटी रुपयांच्या सीफूडची निर्यात


मिळालेल्या माहितीनुसार, चालू आर्थिक वर्षात पश्चिम आशियाई देशात सुमारे 90 कोटी रुपयांच्या सीफूडची निर्यात झाली. यामध्ये झिंग्याची निर्यात सर्वात जास्त झाली आहे. चीनने 99 भारतीय सीफूड प्रक्रिया आणि निर्यात युनिट्सवरील शिपमेंटचे निलंबन देखील उठवले आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षातील सीफूड निर्यात 8 अब्ज ओलांडण्याची अपेक्षा आहे.


Export of Marine Products : 2021-22 मध्ये भारताने 7.76 अब्ज डॉलर सागरी उत्पादनांची निर्यात


आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये भारताने 7.76 अब्ज डॉलर (575.86 अब्ज रुपये) किंमतीच्या 13,69,264 टन सागरी उत्पादनांची निर्यात केली होती. ही आतापर्यंतची सर्वोच्च निर्यात मानली जात आहे. कोळंबीबद्दल बोलायचे झाल्यास या काळात भारतातील कोळंबीचे उत्पादन दहा लाख मेट्रिक टन पार केले होते. 


महत्त्वाच्या बातम्या:


आयात-निर्यातीत 'कोल्या'चा धंदा हा जीवा उधारीच राहणार? सीफूड व्यवसायावर मोठा परिणाम