Rains Update In India : देशातील वातावरणात बदल (Climate Change) होत आहे. काही भागात सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. विशेषत उत्तर भारतात पावसाचा जोर वाढला आहे. हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) आणि उत्तराखंडच्या (Uttarakhand) अनेक भागात भूस्खलनासोबतच ढगफुटीच्या घटना घडल्या आहेत. यामुळं स्थानिकांसह प्रवाशांचेही हाल होत आहेत. दरम्यान, या पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन हवामान विभागानं केलं आहे. 


आज या राज्यात मुसळधार पावसाची शक्यता


उत्तर भारतात सध्या जोरदार पाऊस कोसळत आहेत. या पावसामुळं अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं आहे. यामुळं वाहतुकीवर देखील परिणाम झाला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजही (27 जून) देशातील विविध भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे. छत्तीसगड, गुजरात, केरळ, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. सध्या सुरु असलेल्या पावसामुळं काही ठिकाणी सखल भागात पाणी साचणे, काही भागात पूरस्थिती,तर काही भागात अंडरपास बंद पडणे अशी स्थिती निर्माण होऊ शकते. मोठ्या शहरांमध्ये रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम होण्याची  शक्यता आहे. याशिवाय काही भागात पुरामुळं बागायती शेतीचं नुकसान देखील झालं आहे. 


27 ते 30 जून दरम्यान या राज्यांमध्ये पडणार पाऊस


हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार 28 जून रोजी पूर्व मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान, कोकण आणि गोव्यात मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. 26 ते 28 जून दरम्यान मध्य महाराष्ट्र, पश्चिम राजस्थान, अरुणाचल प्रदेश आणि आसाममध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.मेघालयात 29 आणि 30 जून रोजी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. 27 जूनला पश्चिम बंगाल आणि झारखंडमध्ये तर 27 ते 28 जूनदरम्यान नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये पावसाची शक्यता आहे. 


पाऊस सुरु असताना काळजी घ्या, हवामान विभागाचं नागरिकांना आवाहन 


दरम्यान, घराच्या बाहेर पडण्यापूर्वी ज्या मार्गावरुन प्रवास करणार आहात त्या मार्गावरील वाहतुकीची स्थिती पाहावी. मुसळधार पाऊस सुरु असताना घराबाहेर न पडण्याचे आवाहन हवामान खात्यानं जनतेला केलं आहे. तसेच हवामान विभागानं दिलेल्या सर्व सूचनांचे पालनं करावे. ज्या भागात अनेकदा पाणी साचण्याची समस्या असते अशा ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन हवामान विभागानं केलं आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Cloud Brust: नक्की कोणत्या कारणामुळे ढगफुटी होते? अशा वेळी एकाच भागात जोरदार पाऊस पडतो का? जाणून घ्या...