Imd Tweet :  आज (14 जानेवारी ) भारतीय हवामान स्थापना दिन आहे. यानिमित्ताने भारतीय हवामान विभागने (India Meteorological Department) नुकतेच ट्वीट केले आहे.  ग्लोबल वॉर्मिंग संबंधित हवामान संकटे आणि नैसर्गिक आपत्तींचा अॅटलास IMD कडून जारी करण्यात आला आहे. याचा वापर तेरा सर्वात धोकादायक हवामानशास्त्रीय घटनांसाठी करण्यात येणार आहे. शीतलहरी, उष्णतेची लाट, पूर, विजांचा कडकडाट, हिमवर्षाव, धुळीचे वादळ, गारपीट, गडगडाट, धुके, जोरदार वारे, अतिवृष्टी, दुष्काळ आणि चक्रीवादळ इत्यादी  हवामानशास्त्रीय घटकांसाठी या रोडमॅपचा वापर केला जाणार आहे, अशी माहिती हवामान खात्यानं ट्वीटमधून दिली आहे. 






भारतीय हवामानशास्त्र विभाग आज 147 वा स्थापना दिवस साजरा करत आहे. ग्लोबल वॉर्मिंग संबंधित हवामान संकटे आणि नैसर्गिक आपत्तींचा अॅटलास IMD कडून जारी करण्यात आल्याने हवामानाचे संभाव्य धोके आणि संकटाची माहिती यामधून कळणार आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:



मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह