नवी दिल्ली : नवी दिल्लीत (Navi Delhi) शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Shiv Sena Sanjay Raut) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Sharad Pawar) यांना बसण्यासाठी खुर्ची आणून दिल्याचा फोटो प्रचंड व्हायरल झाला होता. या फोटोवरुन काही लोकांनी संजय राऊतांवर टोलेबाजी केली होती. यावर आज संजय राऊतांना संताप अनावर झाला. यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, लालकृष्ण अडवाणी जरी असते तरी मी खुर्ची दिली असती. महाराष्ट्रातल्या एका पितृतुल्य माणसाला मी खुर्ची आणून दिली. ही गोष्ट जर कुणाला आवडली नसेल तर ही महाराष्ट्राची संस्कृती नसून विकृती आहे, अशा शब्दात राऊतांनी संताप व्यक्त केला. यावेळी त्यांनी टीका करणारांबाबत अपशब्द देशील वापरले. 


राऊत म्हणाले की, शरद पवार यांची प्रकृती त्यांना होणारा त्रास जास्त आहे. आपण बसतो तसं त्यांना खाली बसता येत नाही. म्हणून त्यांना खुर्ची आणून दिली.  लालकृष्ण अडवाणी, मुलायम सिंह यादव, मुरली मनोहर जोशी असे नेते जरी असते तरी मी खुर्ची आणून दिली असती. हे राजकीय विरोधक जरी असले तरी ती पितृतूल्य व्यक्तिमत्व आहेत. 


ज्यांनी अडवाणी साहेबांना आपल्यासमोरही उभं केलं नाही. त्यांनी आम्हाला हे प्रश्न विचारु नये, असं राऊत म्हणाले. बाळासाहेब ठाकरे हेच माझे गुरु आहेत. आणि त्यांनी मला हा संस्कार दिला आहे. मोठ्यांचा आदर करावा. प्रत्येक ठिकाणी राजकारण चालत नाही. हे या ***** लोकांना कळत नाही. ही ***** बंद करा. अशानं तुमचं राज्य महाराष्ट्रात कधीच येणार नाही. हा तुमच्या डोक्यातील कचरा आहे. हा कचरा जर तुम्ही साफ केला नाही तर एखाद्या डंपिंग ग्राऊंडमध्ये लोकं तुम्हाला गाडून टाकतील. हे मी तुम्हाला ऑनरेकॉर्ड सांगतोय. मोठ्या लोकांना बसायला खुर्ची देण्यानं जर तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज, शाहू-फुले-आंबेडकरांचं नाव घेण्याच अधिकार नाही. वडिलधाऱ्यांचा आदर ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. 


रावत यांच्या जाण्यानं देशाच्या मनात अनेक प्रश्न
संजय राऊत म्हणाले की, बिपीन रावत यांच्यावर काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देशाने टाकल्या होत्या. पाकिस्तान, चीनविरोधाती अनेक महत्त्वाच्या कारवायांमध्ये त्यांचा सहभाग होता.  त्यामुळे त्यांच्या जाण्याने देशाच्या मनात अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांची उत्तरे मिळणे आवश्यक आहे. त्यांच्या जाण्याने सरकारसुद्धा गोधळलं आहे.