Gopichand Padalkar on OBC reservation : ओबीसीचे आरक्षण संपवण्याचा डाव महाविकास आघाडी सरकारचा असून अजित पवार यांचा जातीयवाद उफाळून येत असल्याचा आरोप भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील ओबीसी आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली. आता या मुद्यावरून राजकारण तापू लागले आहे. 

Continues below advertisement


भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटले की, राज्य सरकारने आधी पदोन्नतीचा आरक्षण रद्द करून आपण एससी, एसटी, ओबीसी, भटक्या विमुक्त जाती विरोधात आहोत हे दाखवून दिले आहे. ओबीसी आरक्षण विरोधात शरद पवार यांचे कुटुंबीय असल्याचा आरोप पडळकर यांनी केला. उद्या आहे शैक्षणिक आरक्षण ही संपवतील असा आरोपही पडळकर यांनी केला. 


राज्य तरी कशाला चालवता?


गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावरही टीका केली. सुप्रीम कोर्टाने इम्परिकल टाटा जमा करा हे केंद्र सरकारला सांगितले नाही. प्रत्येक गोष्ट केंद्राने करावी असं वाटत असेल तर मग राज्य कशाला चालवत आहात असा सवालही त्यांनी केला. तुम्हाला काम करता येत नसेल आणि रोज उठून केंद्राकडे बोट दाखवत असाल तर राज्य केंद्राकडे देऊन टाका असेही पडळकर यांनी म्हटले. 


पवार कुटुंबीय हे महाराष्ट्रातील ओबीसींचा कर्दनकाळ असल्याचा हल्लाबोल पडळकरांनी केला. ओबीसींचा नेमका शत्रू कोण हे आता ओळखलं पाहिजे असे सांगत भाजप ओबीसी आरक्षणाचा प्रश्न यापुढेही मांडत राहिल आणि यासंदर्भात आंदोलन करत राहू असे पडळकर यांनी म्हटले.


इतर महत्त्वाच्या बातम्या:


OBC Reservation : ओबीसी आरक्षण हा देशाचा प्रश्न; सुप्रिया सुळे यांनी केंद्राकडे केली 'ही' मागणी


Obc Reservation : श्रीमंत मराठ्यांनी ओबीसींना आरक्षण द्यायचं नाही असं ठरवलंय; अॅड. प्रकाश आंबेडकरांचा आरोप


 


पाहा व्हिडिओ : OBC reservation पुन्हा रद्द, निवडणुकांचं काय होणार? घटनातज्ज्ञ Ulhas Bapat एबीपी माझावर