ABP Network Ideas Of India Summit 2023 :  ABP नेटवर्क "आयडियाज ऑफ इंडिया समिट" ची यंदा दुसरे वर्ष असणार आहे.  24-25 फेब्रुवारी रोजी  "आयडियाज ऑफ इंडिया समिट"  आयोजन करण्यात आले आहे. या समिटमध्ये विविध क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती, तज्ज्ञ, वक्ते सहभागी होणार आहेत. "नवीन भारत" म्हणजे काय आणि पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेला भारत देश 2047 पर्यंत विकसित देश म्हणून स्थान मिळवले का, याबाबत विचार व्यक्त करतील. 


या कार्यक्रमात एसएसबीएस ग्रुप ऑफ कंपनीचे संस्थापक संजीव जुनेजा 'उद्याच्या अर्थव्यवस्थेची बांधणी' (Building Tomorrow's Economy) या विषयावर आपले विचार मांडणार आहेत. त्यांच्यासोबत गॅलंट ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक प्रकाश अग्रवाल आणि सेन्को गोल्ड अँड डायमंड्सचे एमडी आणि सीईओ सुवाणकर सेन हेही भविष्यातील अर्थव्यवस्थेविषयी त्यांचे विचार व्यक्त करतील. 


जुनेजा एक गुंतवणूकदार आणि समाजसेवक देखील आहेत. आयुर्वेदिक फर्म "दिविसा हर्बल केअर" चे संस्थापक आहेत. ही भारतातील सर्वात वेगाने वाढणारी FMCG फर्म आहे. ते भारतीय बाजारपेठेत "केश किंग" ब्रँडचे संस्थापक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्याने 2015 मध्ये इमामी लिमिटेडला 262 दशलक्ष डॉलर्समध्ये ब्रँड विकून FMCG क्षेत्रात एक इतिहास रचला. 


एबीपी समिटमध्ये जुनेजा भारताच्या अर्थव्यवस्थेच्या भविष्यावर चर्चा करणार आहेत. जागतिक बँकेच्या मते, आर्थिक वर्ष 2023 मध्ये भारताची अर्थव्यवस्था 6.9 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे. जागतिक मंदीच्या काळातही भारत जागतिक अर्थव्यवस्थेत  Relative Bright Spot असल्याचे आयएमएफने म्हटले आहे. 


'आयडियाज ऑफ इंडिया समिट'चे निर्णायक क्षणी आयोजन


एबीपी नेटवर्कची ‘आयडियाज ऑफ इंडिया समिट’ निर्णायक वेळी पार पडत आहे. संपूर्ण जग भू-राजकीय तणावाच्या काळातून जात आहे. दुसरीकडे, भारतात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांना अवघे एक वर्ष उरले आहे. दक्षिण आशिया आर्थिक अस्थिरतेने ग्रासलेला आहे. 


रोजगार आणि वाढता महागाई हे देशातील महत्त्वाचे मुद्दे आहेत. सध्या, भारत जगात मजबूत स्थितीत आहे. भारत हा जगातील 5 व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेला देश आहे. 2027 पर्यंत देशाने स्वतःला विकसित राष्ट्र बनवण्याची तयारी केली आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सरकार पायाभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य देत आहे. 'मेक इन इंडिया' या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांना चालना देत आहे. या माध्यमातून देशात जागतिक गुंतवणूक आणि स्थानिक उत्पादन आणि रोजगार बळकट होत आहे.


प्रसिद्ध वक्ते आपले विचार मांडतील


ब्रिटनचे माजी पंतप्रधान लिझ ट्रस, इन्फोसिसचे संस्थापक आणि अध्यक्ष नारायण मूर्ती, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि अश्विनी वैष्णव, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, एकनाथ शिंदे आणि भगवंत मान हे ABP नेटवर्कच्या "आयडियाज ऑफ इंडिया समिट" मध्ये त्यांचे महत्त्वाचे विचार मांडतील. या सोबतच बॉलीवूड सेलिब्रिटी झीनत अमान, आशा पारेख, सोशल मीडिया इन्फ्लूएंसर, संगीत क्षेत्राशी निगडीत कलाकार, शिक्षणतज्ज्ञ आणि इतर अनेकजण 'नव्या भारता'वर आपापली मते मांडतील. या दिग्गजांचे विचार  abplive.com आणि marathi.abplive.com या ठिकाणी जाणून घेण्यास विसरू नका.