Ideas of India Summit 2023 : एबीपी नेटवर्कच्या वतीनं 'आयडियाज ऑफ इंडिया समिट 2023' (Ideas of India Summit 2023) या दोन दिवसीय कार्यक्रमाचं मुंबईत आयोजन करण्यात आलं आहे. आजपासून (24 फेब्रुवारी) समिटला सुरुवात झाली आहे. यावेळी ब्रिटनच्या माजी पंतप्रधान लिझ ट्रस यांनी सहभागी होताना मुंबईत आल्याचा आनंद व्यक्त केला आहे. लिझ ट्रस म्हणाल्या, "मी पहिल्यांदा 90 च्या दशकात मुंबई शहरात आले आणि प्रत्येक वेळी या शहराला भेट देताना माझी उत्सुकता आणखी वाढते."


पुढे बोलताना ब्रिटनच्या माजी पंतप्रधान लिझ ट्रस म्हणाल्या, "मी इथे आल्यावर मला प्रत्येक वेळी अधिक ऊर्जा, उत्साह आणि गती पाहायला मिळाली. मी गेल्या काही दिवसांपासून या शहरात आहे आणि G20 साठी सुरू असलेली तयारी पाहून मला फार आनंद झाला आहे." भारताचं कौतुक करताना ब्रिटनच्या माजी पंतप्रधानांनी  भारताला जगातील एक अद्भुत शक्ती म्हटलं आहे. लिझ ट्रस म्हणाल्या की, "जगाला दिशा देण्याची ताकद भारतात आहे. तर, भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, "अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रात भारत ही जगातील सर्वात मोठी शक्ती आहे." 


एक मुक्त लोकशाही जी वेगाने पुढे जातेय : लिझ ट्रस


लिझ ट्रस पुढे म्हणाल्या की, "आम्हाला आमच्या उज्वल भविष्यासाठी सर्वात मोठी आशा भारताकडून आहे. ही एक मुक्त लोकशाही आहे जी वेगाने पुढे जातेय. भारत हा एक असा देश आहे जिथे भाषण स्वातंत्र्य आणि काम करण्याच्या क्षमतेत सातत्याने सुधारणा होत आहे."  


विद्यार्थी दशेत राजकारणात सक्रिय होत्या लिझ ट्रस्ट


लिझ ट्रस यांचा जन्म 26 जुलै 1975 रोजी ऑक्सफर्डमध्ये झाला. त्यांचं पूर्ण नाव मेरी एलिझाबेथ ट्रस असं आहे. दक्षिण पश्चिम नॉरफोक हा त्यांचा संसदीय मतदारसंघ आहे. लिझ यांनी 1996 मध्ये ऑक्सफर्डमधून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं.   त्यांनी तत्त्वज्ञान, राजकारण आणि अर्थशास्त्राचा अभ्यास केला आहे. 


दरम्यान, एबीपी नेटवर्क आयोजित 'आयडियाज ऑफ इंडिया समिट' पार पडत आहे. 'Naya India: Looking Inward, Reaching Out' या थिमवर ही समिट पार पडत आहे. आज (24 फेब्रुवारी) आणि उद्या अशी दोन दिवस ही समिट होत आहे. यामध्ये देश विदेशातीर रथी महारथी विचारमंथन करणार आहेत. यामध्ये सध्याच्या हवामान बदलाने जागतिक अर्थव्यवस्थेला निर्माण झालेल्या संकटांवर आपली मते मांडतील. 


एबीपी नेटवर्कच्या 'आयडियाज ऑफ इंडिया समिट'मध्ये या समिटमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, गीतकार आणि कवी जावेद अख्तर, गायक लकी अली आणि शुभा मुदगल, लेखक अमिताभ यांसारखे उल्लेखनीय वक्ते दिसणार आहेत. अभिनेत्री सारा अली खान आणि झीनत अमान, अभिनेता आयुष्मान खुराना आणि मनोज वाजपेयी, सेलिब्रिटी शेफ विकास खन्ना, स्पोर्ट्स स्टार ज्वाला गुट्टा आणि विनेश फोगट आदी मंडळी सहभागी होणार आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Liz Truss In ABP Network Ideas of India Summit : जागतिक व्यासपीठावर आता भारताचा आवाज; एबीपी नेटवर्कच्या 'आयडियाज ऑफ इंडिया समिट'मध्ये ब्रिटनच्या माजी पीएम लिझ ट्रस यांचे स्पष्ट मत