Meghalaya-Nagaland Election 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज मेघालय (Meghalaya) आणि नागालँडच्या (Nagaland) दौऱ्यावर आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधानांचा हा दौरा आहे. आज पंतप्रधानांची रॅली होणार असून, त्यानंतर मोठी प्रचारसभा होणार आहे. दरम्यान, उद्या (25 फेब्रुवारी) या दोन्ही राज्यात निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. 27 फेब्रुवारीला या दोन्ही राज्यात मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या निमित्तां दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 


Election 2023 : उद्या चार वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार 


नागालँड (Nagaland) राज्यातील दिमापुरमध्ये सकाळी 10 वाजता पंतप्रधानांची जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर दुपारी 12 वाजता शिलाँगमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रोड शोमध्ये सहभागी होतील. तर मेघालयमधील (Meghalay) तुरा येथे दुपारी दोन वाजता पंतप्रधानांची जाहीर सभा होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेघालय आणि नागालँडमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मेघालय आणि नागालँड या दोन्ही राज्यात 27 फेब्रुवारीला विधानसभेची निवडणूक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींच्या आज प्रचारसभा होमार आहेत. दरम्यान, शनिवारी दुपारी 4 वाजता प्रचार संपणार आहे. 


Meghalaya Election : मेघालयमध्ये भाजप सर्वच 60 जागावंर लढत आहे 


भाजपने मेघालयातील सर्वच 60 विधानसभा जागांवर उमेदवार उभे केले आहेत. तर नागालँडमध्ये  2018 च्या निवडणुकीत NDPP (राष्ट्रवादी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी) आणि भाजप यांच्यात 40:20 असा जागा वाटपाचा फॉर्म्युल्या ठरला होता. हा फॉर्म्युल्या पुढेही कायम ठेवण्यात आला आहे. . तसेच त्रिपुरामध्ये भाजपने 55 जागा लढवल्या आहेत. तर पाच जागा त्यांच्या मित्रपक्ष असलेल्या इंडिजिनस पीपल्स फ्रंटला दिल्या आहेत. या तिनही राज्यांतील मतमोजणी 2 मार्चला होणार आहे.


Rahul Gandhi on PM Modi : राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा 


काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनीही बुधवारी (22 फेब्रुवारी) मेघालयमधील शिलाँगमध्ये रॅली काढली होती. त्यानंतर राहुल गांधी यांनी जाहीर सभा घेतली होती. यावेली त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपवर जोरदा निशाणा साधला होता. मी पंतप्रधानांना त्यांच्या अदानीसोब असणाऱ्या संबंधांबद्दल विचारले. मी एक चित्र देखील दाखवले ज्यामध्ये पंतप्रधान अदानी यांच्या विमानात बसले आहेत. पंतप्रधान मोदी त्यांचे घर असल्यासारखे आराम करत आहेत. पंतप्रधान मोदींनी या संदर्भात एकाही प्रश्नाचे उत्तर दिले नसल्याचे राहुल गांधी म्हणाले. 


महत्त्वाच्या बातम्या:


Nagaland Election 2023: नागालँड विधानसभा निवडणुकीत 59 जागांसाठी 183 उमेदवारांमध्ये लढत; 'या' ठिकाणी भाजपचा उमेदवार बिनविरोध