Coronavirus Cases Today in India : देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत किंचित घट झाली आहे. सोमवारी दिवसभरात देशात 13 हजार 086 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर 24 रुग्णांचा मृत्यू कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारताता आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या पाच लाखांच्या पुढे पोहोचली आहे. तर सक्रिय रुग्णांची संख्याही एक लाखाच्या पुढे गेली आहे. रविवारच्या तुलनेनं सोमवारी नोंद झालेल्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. रविवारी देशात 16 हजार 135 नवीन कोरोना रुग्णांची नोंद आणि 24 रुग्णांचा मृत्यू झाला होता. सोमवारी 13 हजार 086 नवे कोरोना रुग्ण आढळले.


एका दिवसात 12 हजार 456 रुग्ण कोरोनामुक्त


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नवीन आकडेवारी जारी केली आहे. यानुसार देशात मागील 24 तासांत 12 हजार 456 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोना महामारी सुरु झाल्यास देशात आतापर्यंत एकूण 4 कोटी 28 लाख 91 हजार 933 रुग्णांनी कोरोना संसर्गावर मात केली आहे. दरम्यान देशात आतापर्यंत 5 लाख 25 हजार 223 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 






मुंबईत सोमवारी 431 रुग्णांची नोंद
मुंबईमध्ये मागील काही दिवसांत कोरोना (Corona) रुग्णसंख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. पालिकेने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सोमवारी मुंबईत 431 नव्या रुग्णांची भर पडली आहे. वाढत्या आकडेवारीमुळे प्रशासनासह (Mumbai BMC) नागरिकांची चिंता वाढली आहे. मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. मुंबईत सोमवारी 1060 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.


महाराष्ट्रात 1515 नवे कोरोनाबाधित
राज्यात सोमवारी 1515 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर सोमवारी दिवसभरात एकूण 2062 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. सर्वाधिक रुग्ण हे मुंबईतील आहे. तर राज्यात तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.


महत्वाच्या इतर बातम्या :