मुंबई: विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांबाबत ट्विट करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी, आता ग्राम पंचायत निवडणुकीतील यशाबद्दलही ट्विट केलं आहे.


भाजपला ग्रामपंचायत निवडणुकीत विजय मिळवून देणाऱ्या महाराष्ट्रातील जनतेचे आभार असं ट्विट मोदींनी केलं आहे.

“राज्यभरातील ग्राम पंचायतींमध्ये भाजपला यश मिळवून देणाऱ्या महाराष्ट्रातील जनतेचे मन:पूर्वक आभार” असं मोदी म्हणाले.

https://twitter.com/narendramodi/status/917610425004511232

याशिवाय मोदींनी महाराष्ट्र भाजपचंही कौतुक केलं आहे.

मोदी म्हणतात, “ग्रामीण भागातील जनतेचा, शेतकऱ्यांचा, तरुणांचा आणि गरिबांचा भाजपच्या विकासाच्या अजेंडाला पाठिंबा आहे, असंच हा विजय दर्शवत आहे”.

https://twitter.com/narendramodi/status/917610739996733440

या विजयाबद्दल मी महाराष्ट्र भाजप, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचं अभिनंदन करतो, असंही मोदींनी म्हटलं आहे.

https://twitter.com/narendramodi/status/917611043530182656

सर्वपक्षीयांचे विजयाचे दावे

दरम्यान, भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्याचा दावा केला असला, तरी काँग्रेस-राष्ट्रवादीनेही तसाच दावा केला आहे. महत्त्वाचं म्हणजे ग्राम पंचायत निवडणुका पक्षाच्या चिन्हावर होत नाहीत. स्थानिक पॅनेल किंवा व्यक्तीगत या निवडणुका लढवल्या जातात. शिवाय निवडणूक आयोगही पक्षवार निकाल जाहीर करत नाही तर सर्व विजयी उमेदवारांची यादी जाहीर करतं.

त्यामुळे निवडून आलेला सदस्य आपलाच आहे, असा दावा सर्वपक्षीयांकडून केला जातो.

त्यानुसार भाजपने 50 टक्के ग्राम पंचायती जिंकल्याचा दावा केला आहे.  महत्त्वाचं म्हणजे यावेळी सरपंच निवड जनतेतून होती, त्यामुळे केवळ सरपंच निवडून आला म्हणजे सत्ता आली की बहुमत मिळालं म्हणजे सत्ता आली, यापैकी कोणत्या आधारे दावे केले जात आहेत, हा खरा प्रश्न आहे.