बडोद्यात प्रचारादरम्यान राहुल गांधींना उपस्थित एका महिलेने महागाई संदर्भात प्रश्न विचारला. “काँग्रेस सत्तेत आल्यास महागाई कमी करण्यासाठी काय करेल?”, महिलेच्या या प्रश्नाला राहुल गांधींनी अत्यंत संयमी आणि सोप्या भाषेत उत्तर दिले. शिवाय, आताही महागाई कशाप्रकारे कमी केली जाऊ शकते, हे पटवून दिले.
"महगाईचं मूळ पेट्रोलच्या किंमती आहेत. तुम्ही ज्या चपला घातल्यात, कपडे परिधान केलेत, त्या सर्वात पेट्रोलची किंमत सामावलेली आहे. सर्व वस्तूंमध्ये पेट्रोलच्या किंमती समाविष्ट असतात. मग आता तुम्ही पाहत असाल की, याआधी 140 डॉलरला बॅरल असायचे, आता 50 डॉलरला बॅरल असते. मात्र त्याचा फायदा हिंदुस्तानातील जनतेला मिळत नाही. मग हा फायदा कुणाला जातोय?", असे म्हणत अत्यंत सोप्या शब्दात महागाई आणि त्यासंदर्भात राहुल गांधींनी समजावून सांगितले.
याचसोबत, महागाईबाबत राहुल गांधी यांनी समोरील उपस्थित लोकांना त्यांच्या संयमी भाषेत समजावून सांगितले.
VIDEO : पाहा राहुल गांधी यांनी काय उत्तर दिले?
https://twitter.com/ANI/status/917427966245609472