कोईंबतूर : लग्नाच्या पाच दिवसांनंतर पत्नीने पतीच्या हातावर गर्लफ्रेण्डच्या नावाचा टॅटू पाहिल्यानंतर तिचं रागावरील नियंत्रण सुटलं. बस स्टॉपवर गर्दीतच तिने पतीला मारहाण करण्यास सुरुवात केली. पतीने पळ काढण्याचा प्रयत्न केला, पण पत्नीच्या रागापुढे त्याचा टिकाव लागू शकला नाही.

तामीळनाडूतील कोईंबतूरच्या किनाथुकडावूमध्ये हा प्रकार घडला. 22 वर्षाची नवविवाहिता आपल्या 20 वर्षांच्या पतीसोबत बस स्टॉपवर बसली होती. तेव्हा तिची नजर पतीच्या खांद्यावर गेली. तिथे एका तरुणीच्या नावाचा टॅटू होता, जी पतीची गर्लफ्रेण्ड होती. टॅटू पाहिल्यानंतर तिचा रोमँटिक मूड बिघडला आणि पारा चढला. सुरुवातीला ती पतीवर ओरडू लागली, त्यानंतर गर्दीतच त्याला मारु लागली.

तिथे उपस्थित काही लोक दोघांना घेऊन साईबाबा कॉलनी पोलिस स्टेशनमध्ये घेऊन गेले. पोलिसांनी दोघांना सार्वजनिक ठिकाणी भांडण न करण्याची समज दिली. तसंच पत्नीला किनाथुकडावू पोलिस स्टेशनमध्ये जाण्यास सांगितलं. दरम्यान तरुणीचं हे दुसरं लग्न असून तिने प्रेमविवाह केला होता.