नवी दिल्ली : देशाचा विकास दर कमी झाला आहे. एप्रिल-जून 2017 या काळात देशाच्या विकास दरात 5.7 टक्क्यांपर्यंत घसरण झाली. गेल्या वर्षी याच काळात देशाचा विकास दर 7.9 टक्के एवढा होता. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत विकासदर 2.2 टक्क्यांनी घसरला आहे.
उत्पादन क्षेत्रात घट झाल्यामुळे विकास दरात मोठी घसरण झाली. तर एप्रिल-जून या काळात सेवा क्षेत्रातील विकास दराचे आकडे समाधानकारक आहेत.
देशातील महत्त्वाच्या 8 क्षेत्रांचा विकास दर जुलैमध्ये 2.4 टक्क्यांवर घसरला आहे. एका वर्षापूर्वी याच 8 क्षेत्रांचा विकास दर 3.1 टक्के एवढा होता. अर्थव्यवस्थेच्या या 8 महत्त्वाच्या क्षेत्रांचा विकास दर कमी झाल्याने त्याचा परिणाम देशाच्या विकास दरावर पडला.
दरम्यान नोटाबंदीमुळे देशाचा विकास दर घटला, असा आरोप काँग्रेसने केला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कालच नोटाबंदीनंतरची आकडेवारी जाहीर केली आहे. यामध्ये जुन्या 99 टक्के नोटा बँकेत जमा झाल्याचं आरबीआयने म्हटलं आहे. ज्यावरुन देशातील राजकारण तापलं आहे.