एचएसबीसी आणि सिटी ग्रुपच्या अंदाजानुसार, नोटाबंदीमुळे भारतातील ग्रहाकांची खरेदी क्षमता आणि मागणी कमी झाली असून, याचा थेट परिणाम देशांतर्गत उत्पादनावर आणि पर्यायाने जीडीपीच्या वाढीवर पडेल.
केंद्रीय सांख्यिकी संघटनेने (CSO) 2016-17 या आर्थिक वर्षाच्या जीडीपी वाढीचा अंदाज 7.6 टक्क्यांहून कमी होऊन 7.1 टक्के असा वर्तवला आहे.
एचएसबीसीच्या एका रिपोर्टनुसार, जीडीपी वाढ 2016-2017 या आर्थिक वर्षात सीएसओच्या अंदाजापेक्षाही कमी राहण्याची शक्यता वर्तवली आहे. चालू वर्षात जीडीपी वाढ 6.3 टक्के राहू शकते, असाही अंदाज या रिपोर्टमध्ये सांगण्यात आला आहे.
सिटी ग्रुपने दिल्लीत प्रसिद्ध केलेल्या एका रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, नोटाबंदीमुळे खरेदी क्षमतेवर परिणाम झाला आह आणि यामुळे खासगी गुंतवणुकीवरही मोठा परिणाम पाहायला मिळण्याची शक्यता आहे. सिटी ग्रुपच्या अंदाजानुसार, चालू वर्षात जीडीपीचा विकास दर 6.8 टक्के इतका राहण्याची शक्यता आहे.