एटीएम मशिन लावणे, डेअरी व्यवसाय सुरु करणे किंवा व्यावसायिक उत्पादनांच्या विक्रीसाठी या जागेचा वापर करु शकाल. विशेष म्हणजे सरकारच्या सहाय्याने यासारखे व्यवसाय तुम्ही सुरु करु शकाल. यामुळे तुमचं उत्पन्नही फिक्स राहील.
एटीएम बसवा
तुमच्याकडे 10 बाय 10 फूट म्हणजेच 100 चौरस फूट जागा असेल, तर महिन्याकाठी तुम्ही घरबसल्या 40 हजारांपर्यंत कमाई करु शकाल. परिसरात कोणत्या बँकेचं एटीएम नाहीये, याची माहिती काढून घ्या. त्यानंतर ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष भेटून तुम्ही पुढील बोलणी करा. यात बँकेच्या अटींची पूर्तता झाल्यास तुमच्या जागेवर संबंधित बँकेचं एटीएमचं बसवू शकाल. लोकेशननुसार बँकेशी तुम्ही जागेच्या भाड्याबाबत अंतिम निर्णय घेऊ शकता.
डेअरी प्रॉडक्ट्स
मार्केटसारख्या गर्दीच्या ठिकाणी तुमच्याकडे 100 ते 300 चौरस फूट जागा असेल, तर अमूल सारख्या मोठ्या डेअरी कंपन्याही तुम्हाला आईस्क्रिम पार्लरची फ्रँचाईझी देऊ शकतात. अमूलकडून ब्रँड डिपॉझिट म्हणून केवळ 25 हजार रुपये घेतले जातात. ही रक्कम तीन वर्षांपर्यंत रिफंड होत नाही. डीप फ्रिजर, रेफ्रिजरेटर, ओवन, चेस्ट मिल्क कूलर सारख्या वस्तूंवर एक ते दीड लाखांची गुंतवणूक केल्यास नंतर मात्र महिन्याला 20 ते 30 हजार रुपयांचं उत्पन्न मिळतं.
जन औषधि सेंटर
तुमच्याकडे 120 चौरस फुटांचं दुकान असेल तर तुम्ही सरकारकडे जन औषधि सेंटर सुरु करण्यासाठी अर्ज करु शकता. एक लाख रुपयांचं फर्निचर, शिवाय फ्रीज, संगणक, इंटरनेट यासारख्या गोष्टींवर एक लाखांची गुंतवणूक आणि एक लाख रुपये औषध खरेदीसाठी घातल्यास महिन्याला 20 ते 30 हजारांची कमाई शक्य आहे.