Blankets Clean in Railways: अनेकांना रेल्वेने प्रवास करणे आवडते. लांबचा प्रवास करायचा असेल तर अनेक जण रेल्वेने प्रवास करणं पसंत करतात. तसंच आपल्यापैकी जवळपास सर्वांनी कधी ना कधी रेल्वेने प्रवास केलाच असेल. रेल्वेमध्ये प्रवास करताना, लांबच्या प्रवासात रेल्वेमध्ये वापरण्यासाठी चादर आणि ब्लँकेट दिले जातात. ते एसी कोचमध्ये प्रवास करणाऱ्या लोकांना वापरण्यासाठी दिले जातात. यामध्ये थर्ड एसी, सेकंड एसी आणि फर्स्ट एसी कोचचा समावेश असतो. पण हे ब्लँकेट आणि चादरी कधी धुतल्या जातात हे तुम्हाला माहिती आहे का? हे ब्लँकेट आणि चादरी कधी धुतल्या जातात त्याबाबत खुद्द रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल (बुधवारी) लोकसभेत उत्तर दिले आहे.
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या लोकांना दिले जाणारे ब्लँकेट महिन्यातून एकदा तरी धुतले जातात. बेडरोल किटमध्ये ब्लँकेट आणि अतिरिक्त बेडशीट देखील दिली जाते.आपल्या लेखी उत्तरात रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, भारतीय रेल्वेमध्ये वापरण्यात येणारे ब्लँकेट वजनाने हलके आणि धुण्यास सोपे आहेत. एवढेच नाही तर प्रवाशांना आरामदायी प्रवासाचा अनुभवही देतात.
कोणी विचारला प्रश्न
काँग्रेस पक्षाचे गंगानगरचे खासदार कुलदीप इंदोरा यांनी याबाबत रेल्वेमंत्र्यांसमोर प्रश्न उपस्थित केला होता. प्रवासी स्वच्छतेच्या मूलभूत निकषांची पूर्तता करत असताना ब्लँकेट्स महिन्यातून एकदाच धुतात. उत्तर देताना रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, नवीन ब्लँकेट्सचे बीआयएस मानकही वाढवण्यात आले आहे. ब्लँकेट स्वच्छ करण्यासाठी मशीन आणि द्रवपदार्थांसाठी देखील एक मानक निश्चित करण्यात आले आहे. यासंबंधीच्या तक्रारींसाठी रेलमदद पोर्टलही अपडेट करण्यात आले आहे.
लांबचा प्रवास करण्यासाठी प्रवाशांना एसी बर्थमधून प्रवास करणं अधिक सोयीचं ठरतं, अनेक लोक यामधून प्रवास करतात. कारण त्यात अनेक सेवा-सुविधा दिल्या जातात. याच एसी कोचमध्ये प्रवाशांना प्रवासासाठी दोन बेडशीट, एक उशी, कव्हर, एक टॉवेल आणि एक ब्लँकेट दिली जाते. जेणेकरून प्रवासादरम्यान वापरता येते, याचे शुल्क तिकीटमधून घेतले जाते.
प्रवासादरम्यान काय काय दिलं जात?
एसी बर्थमधून प्रवास करण्यावर प्रवासी जास्त भर देतात. त्यामध्ये अनेक सेवा-सुविधा पुरवल्या जातात. याच एसी कोचमध्ये प्रवाशांना दोन बेडशीट, एक उशी त्याचे कव्हर, एक टॉवेल आणि एक ब्लँकेट दिली जाते. मात्र, ते मोफत नसते, तर त्याचं शुल्क तिकीटमधून घेतले जाते. जेवणासह इतरही सुविधांचा लाभ घेता येतो.